लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आजकाल सर्वांनाच ऍसिडिटीचा त्रास होतो. ऍसिडिटी किंवा पित्त होणे म्हणजेच पोटातील ग्रंथींमध्ये ऍसिडचा जास्त स्राव होतो. त्यामुळे गॅस, श्वासाची दुर्गंधी, पोटदुखी आणि इतर लक्षणे निर्माण होतात. दोन जेवणाच्या वेळातील अनियमित अंतर, रिकामे पोटी किंवा चहा, कॉफी, धूम्रपान किंवा मद्यपान जास्त प्रमाणात केल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो.

या लेखात आम्ही ऍसिडिटीवरील काही घरगुती उपचारांची यादी समाविष्ट केली आहे ज्यामुळे ऍसिडिटीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते.

तुमच्या स्वयंपाकघरात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये नेहमी असणाऱ्या ह्या 5 गोष्टी देऊ शकतात ऍसिडिटीपासून आराम.

तुळशीची पाने : तुळशीच्या पानांचे गुणधर्म ऍसिडीपासून त्वरित आराम देऊ शकतात. ऍसिडीटीचे पहिले चिन्ह म्हणजे गॅस. असे दिसून येताच तुळशीची काही पाने खा किंवा एक कप पाण्यात 3-4 तुळस पाने काही मिनिटे उकळवा. ह्या 0पाण्याचे वारंवार सेवन करा. अॅसिडिटीसाठी हा एक उत्तम घरगुती उपचार आहे.

सोंफ : ऍसिडिटी रोखण्यासाठी तुम्ही जेवणानंतर सोंफ देखील खाऊ शकता. ह्यात असणाऱ्या तेलामुळे पचन सुरळीत होण्यास मदत होते.

दालचिनी : दालचिनी ऍसिडिटीवर नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करते. ह्यातील गुणधर्म पचन आणि शोषण सुधारून आपले पोट स्थिर करू शकते. दालचिनी घातलेला चहा ऍसिडिटीवर फायदेशीर ठरतो. दालचिनी पोषक तत्वांचा आणि आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्मांनी भरलेली आहे.

ताक : सात्विक अन्न म्हणून आयुर्वेदात प्रसिध्द असणारे ताक ऍसिडिटीसाठी रामबाण उपाय आहे. ताकात लॅक्टिक ऍसिड नावाचे रसायन असते जे ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते. उत्तम परिणामांसाठी काळे मिरे आणि कोथिंबीरच्या पानांचा ताकात उपयोग करावा.

अद्रक : आल्यामध्ये उत्कृष्ट पाचक आणि अँटी-इंफ्लामेट्री गुणधर्म असतात. ऍसिडिटी कमी करण्यासाठी तुम्ही आल्याचा तुकडा चघळू शकता किंवा उकळलेल्या पाण्यात केलेला आल्याचा चमचाभर रस दिवसातून दोन-तीन वेळा घेऊ शकता.

तेव्हा ह्यापुढे जर आपणास कधी अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपचार करून पहा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

-भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.in’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.