Loading...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहुणे आल्यापासुन बरीच धम्माल मस्ती सुरू आहे… वेगवेगळे टास्क ते सदस्यांना देत आहेत… किशोरी शहाणे आणि अभिजीत बिचुकले यांना संजय नार्वेकर यांनी दिलेला मजेदार टास्क आज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि याचसोबत अभिजीत केळकर आणि नेहाला देखील एक टास्क देणार आहेत. ज्यामध्ये अभिजीत केळकरला नेहा आणि नेहाला अभिजीत केळकर बनून कसे एकमेकांशी भांडतात याची अॅक्टिंग करायची आहे … आणि अशा प्रकारे घरामध्ये अदलाबदली होणार आहे. या दोघांनीही या टास्कमध्ये पुरेपूर धम्माल आणण्याचा प्रयत्न केला आहे… ज्याची सुरुवात अभिजीतने नेहासारख्या चेहर्‍याचे हावभाव करून केली… नेहाने अभिजीत जसे नेहमी म्हणतो “अरे हीच नेहेमीच आहे, कायम असचं करते ही. त्यावर अभिजीतने नेहा कसे व्यक्त होते हे करून दाखविले आणि तू कसं करतोस रे… आणि ही अॅक्टिंग सुरू झाली.

Loading...

Loading...

या टास्कमध्ये अजून काय धम्माल मस्ती केली ? सदस्य त्यावर काय म्हणाले ? घरामध्ये झालेली ही अदलाबदली नक्की बघा आणि तुम्ही देखील याचा आनंद लुटा… आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Loading...