सध्या को’वि’ड काळात सर्वसामान्य आणि इंडस्ट्रीत म्हणजे कला क्षेत्रात अनेकांनी लग्न केलेली आहेत. म्हणजे कुणीच एवढ्या अवघड वाटणाऱ्या काळात मागे राहिलं नाही. त्यात मराठी मधील प्रसिद्ध झालेली कलाकार यांनी ही खूप जणांनी लग्न केलेली आहे.

त्यात अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांनी काही दिवसांपूर्वी लग्न करून आपलं वैवाहिक आयुष्य सुरू केलेलं आहे. तर आत्ता त्यांचा लग्नाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात तो नेमकं काय आहे ? चला, सविस्तर जाणून घेऊयात..

View this post on Instagram

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या ‘तेजाज्ञा’ या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अभिज्ञाने मेहुल पै याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यामध्येच आता तिच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक सुरेख व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील काही क्षण कैद करण्यात आले आहेत.

यात लग्नापूर्वीची लगबग, ऐन लग्नातील धावपळ आणि लग्न लागतानाचे काही क्षण असं सारं काही या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

याच दरम्यान, अभिज्ञा- मेहुलच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती अभिज्ञा-मेहुलने लग्नगाठ बांधली. मेहुल मुंबईत स्थायिक असून ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.

दोघे आता सुखी आणि समाधानी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघेही खूप खुश आहे. त्यांना दोघांना पुढील वाटचाली शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.