Abhidnya Bhave

एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. तिने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्याव सगळीकडून तिला सकारात्मक आणि नकारात्मक रित्या चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे, अभिज्ञा भावे. होय, जिला आपण अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलं आहे.

”खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिनं चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. अभिज्ञानं तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न करणार आहे त्याचं नाव माहितेय ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

मेहूल पै याच्यासोबत अभिज्ञा लग्न करणार आहे. दोघांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केलेले आहेत. तिचा मेहुल पै सोबत नुकताचा साखरपुडा झाला असून तिनं शेअर केलेल्या एका फोटोची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अभिज्ञानं एका खास व्यक्तीचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिज्ञा आणि मेहूल रिलेशनशिपमध्ये आहेत. आधी त्यांची मैत्री होती. आता प्रेमातून लग्नात रूपांतर होणार आहे. परंतु अभिज्ञानं सुरुवातीला यावर मौन पाळलं होतं. साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिज्ञानं चाहत्यांना एक गोड सरप्राइज दिलं असंच म्हणावं लागेल.

खरं तर सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अभिज्ञा एयर होस्टेस होती हे तर सर्वांनाच माहित आहे, पण यापूर्वी तिचं लग्न झाल्याचं खूपच कमी जणांना माहित आहे. २०१४ साली अभिज्ञा वरुण वैटिकरसोबत विवाहबंधनात अडकली होती. मात्र, काही कारणांमुळं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता त्यांचं लग्न का मोडलं ? याचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही.

याच दरम्यान, विणकाम, रंगवलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या, जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या कलाकृती, चित्रं अशा विविध कलाकृती सध्या अभिज्ञा भावेच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर झळकत आहे. पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारा वस्तूंचा पुनर्वापर यातून पाहायला मिळतोय.

मेहुल पै हा आता अभिज्ञाचा नवरा होणार आहे. त्या दोघांना नव्या जीवनाच्या सुरुवातीसाठी टीम स्टार मराठी कडून खुप शुभेच्छा !..