भरभरून मनोरंजन करणाऱ्या टॉकीज प्रीमियर लीग ची सुसाट घौडदौड सुरु आहे. मागील रविवारी रसिक प्रेक्षकांनी परी हूं मैं या सत्य परिस्तिथीवर आधारित असणाऱ्या चित्रपटाचा आस्वाद घेतला. डोळ्यात अंजन घालणारा अ ब क हा चित्रपट झी टॉकीज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे या रविवारी म्हणजेच २४ मे २०२० रोजी.

“बेटी बचाव बेटी पढाव” हा संदेश या चित्रपटातून देण्यात आलेला आहे .अभिनेता सुनील शेट्टी आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी या चित्रपटातून मराठी सिनेमा श्रृष्टीत पदार्पण केलं आहे. किशोर कदम, सतीश पुळेकर यांसारख्या नामवंत कलाकारांनी आपल्या भूमिका उत्कृष्ट साकारल्या आहेत. अमृता फडणवीस यांचं प्रेरणागीत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  हरी (साहिल जोशी) आणि जनी(मैथिली पटवर्धन) या भावंडांची आई जनी ला जन्म देते आणि मरण पावते. तेव्हा गाव जनीला पांढऱ्या पायाची ठरवतं. हरी आणि जनी यांचे वडील गावाच्या विरोधात जाऊन दोघांना वाढवतात. परंतु काही काळानंतर ते ही अपघातात मरण पावतात. गावकरी जनीला पांढऱ्या पायाची ठरवून दोघांना गावा बाहॆर काढतात. हरी गावकऱ्यांना आवाहन देतो कि तो त्याच्या बहिणीला शिकून मोठी, खूप करुन दाखवेल. त्यानंतर सुरू होतो हरी आणि जनीचा संघर्ष मय प्रवास. हा संघर्ष काय आहे, जनी खरोखरच शाळेत जाते का, ती शिकते का..?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पाहायला विसरु नका अ ब क येत्या रविवारी म्हणजेच २४ मे २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.