आपला देश एका फार मोठ्या संस्कृतीचा वारसा घेऊन पुढे जाणारा देश आहे. आपल्या देशामध्ये आजही अनेक प्राचीन मंदिरं आहेत, ज्यांच रहस्य एकविसाव्या शतकात देखील आपण उलगडू करू शकलेलो नाहीत‌. अनेक अशी गुढ मंदिर आहेत ज्यांच्या रहस्यापुढे वैज्ञानिकांनीही हार मानलेली आहे. या मंदिरावरती सामान्य भाविकांची अपार श्रद्धा आहे. असं म्हटलं जातं की या मंदिरांमध्ये गेल्यावर मनुष्य आपल्या सर्व समस्यांमधून मुक्त होतो, त्याच्या मनाला शांतता प्राप्त होते.

आज आम्ही आपल्याला अशाच एका मंदिराबद्दल माहिती देणार आहोत, आपल्या देशामध्ये अनेक भगवती मंदिरं प्रसिद्ध आहेत. पण आज आम्ही एका अशा भगवती मंदिराबद्दल माहिती देणार आहोत ज्या मंदिराच्या रहस्याचा उलगडा आजपर्यंत विज्ञान देखील करू शकलेलं नाही. असं म्हटलं जातं कि या मंदिरामध्ये देवी अग्नीने स्नान करते. खरं पाहिलं तर हे मंदिर मेवाड येथे स्थित आहे. मेवाडमधील महाराणी यांच्या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे नाव ईडाना माता मंदिर असे आहे. मेवाडच्या प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असे हे मंदिर आहे.

या मंदिराची ख्याती संपूर्ण राजस्थानमध्ये पसरलेली आहे. असं म्हटलं जातं की, इथे माता स्वतःच्या शक्तीने अग्नी प्रज्वलित करून त्याच अग्नीने स्नान करते. यासोबतच असं देखील म्हटलं जातं की इथे अर्धांगवायुने ग्रासलेल्या व्यक्तीने जर दर्शन घेतले तर त्याचा आजार बरा होतो. भगवती देवीची पूजा या मंदिरामध्ये ईडाना देवी या नावाने होते.हे प्राचीन मंदिर राजस्थानच्या उदयपुर पासून जवळपास शंभर किलोमीटर दूर बंबोरा या गावात आहे. या मंदिरात दर्शनासाठी दुरून भाविक भक्त येत असतात. इथे भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून लोक दर्शनासाठी येतात.

नवरात्रीच्या वेळेस या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते, कारण इथे मान्यता आहे की नवरात्रीमध्ये देवी प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करते. येथील मान्यतेनुसार सांगितलं जातं की जेव्हा देवी प्रसन्न होते तेव्हा अग्नि तिच्या सभोवताली पसरला जातो. येथील एक कथेनुसार असे लक्षात आले आहे की महाभारतात देखील या मंदिराचे वर्णन करण्यात आलेले आहे. प्राचीन काळात येथील स्थानिक राजांनी या मंदिरातील देवीला आपले कुलदैवत मानले आहे.

कुठल्याही शुभ प्रसंगी या मंदिरामध्ये खास उत्सव केला जात असे आणि आज देखील त्या राजांचे वंशज इथे येऊन शुभ प्रसंग साजरे करतात. इथे इतर मंदिरांपेक्षा एक विचित्र परंपरा आहे इथे कुठलाही पुजारी मातेची सेवा करत नाही तर इथे ग्रामीण लोकच मातेची पूजा-अर्चा करतात. या अग्नी स्नानामुळेच आज पर्यंत ते मंदिर पूर्णत्वास गेलेले नाही किंवा असे म्हणू शकता ही या मंदिराचे बांधकाम कोणीही आजपर्यंत पूर्ण करू शकले नाही.

देवीच्या मूर्तीच्या मागे आपल्याला अनेक त्रिशूल दिसुन येतात. असे म्हटले जाते की देवीने मनोकामना पूर्ण केल्यानंतर भक्त देवीच्या मागे एक त्रिशूळ उभा करतो आणि देवीची कृपादृष्टी रहावी यासाठी देवीकडे याचना करतो.