सध्या सर्वसामान्य लोकांच्या सोबत कलाकार लोकं यांच्या तही लग्नाची धा’म’धू’म सुरू आहे. नुकतंच नताशा आणि वरून धवन यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली तर त्यासोबत मराठी मधील काहींनी आपल्या आयुष्यातील जोडीदार शोधून नवी सुरुवात केली. यात सर्वांत जास्त आनंद मिळतो तो चाहत्यांना.
कारण आपले आवडते सेलिब्रिटी कसं सेलिब्रेशन करतात याकडे त्यांचं आवर्जून लक्ष असतं. तर सध्या एक प्रसिद्ध अभिनेता लग्न करतोय किंवा त्याने होकार दिलाय हे व्हायरल होत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो कोण ? बाहुबली फेम. होय तुम्हाला कळलं असेल की तो फेम असलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच प्रभास. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात. त्याच्याविषयी.
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रभासचे अनेक चाहते त्याच्या लग्नाची वाट पाहात असतानाच आता त्याच्या लग्नाबद्दलची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मात्र, ही अनुष्का नसून एक एनआयआर मुलगी आहे.
बाहुबली या सिनेमाच्या यशानंतर प्रभासच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली. यानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता समोर आलेली ही बातमी प्रभासच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा ध’क्का असणार आहे.
प्रभास अभिनेत्री अनुष्का शेट्टीसह नाही तर दुसऱ्याच मुलीसह विवाहबंधनात अडकणार आहे. ही मुलगी एनआयआर आहे. प्रभास आणि अनुष्काची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत असली तरी लग्नगाठ मात्र तो अनुष्कासोबत नाही तर एनआयआर म्हणजेच अनिवासी भारतीय मुलीसोबत तो विवाहबंधनात अडकणार आहे.
प्रभासची होणारी पत्नी ही अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. त्यांचं लग्न लव मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. प्रभासनं या लग्नाला होकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रभास सध्या आपल्या आगामी राधे श्याम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राधे श्याम या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रभासच्या लग्नाविषयीची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या बातमीला अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिलेला नाही.
प्रभास हा बहुचर्चित असा बाहुबली अभिनेता आहे त्यामुळे तो प्रतिष्ठित असलेल्या मुलीसोबत लग्न करणार हे साहजिकच. त्यामुळे त्यांनी सुरू केलेलं वैवाहिक आयुष्य आता एका ठराविक अंतराने वैवाहिक मार्गाने सुरू होणार आहे. त्या दोघांचं ठरलेलं हे जर शंभर टक्के खरं असेल तर स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.