बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून लॉकडाऊन असतानाही सतत
या लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरी लग्नसोहळा झालेले आहेत. पण अश्यात अभिनेते अभिनेत्री कश्याला मागे राहतील ? त्यांनी सुद्धा संधी साधून लग्नाच्या बंधनात अडकायचं ठरवलं आहे.
सध्या मनोरंजन इंडस्ट्री मधून ही खूप चांगल्या बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने रोहनप्रीत या सिंगरसोबत लग्न केलं तर त्याचबरोबर सिंघम या चित्रपटात अभिनेता अजय देवगनसोबत दिसणारी अभिनेत्री काजल अग्रवालही काही दिवसांत लग्न करणार आहे. काजलच्या घरात लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे.
अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच बिझनेसमन गौतम किचलूबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. काजलने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. आता काजलच्या घरी लग्नापूर्वीची कामे सुरू झाली आहेत. अलीकडेच काजलने तिच्या बहिणीबरोबर पजामा पार्टी केली होती. ज्याची काही फोटो तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
काजलने तिची बहीण निशा अग्रवालसोबत ‘पजामा पार्टी’ केली आहे. ज्यामध्ये काजल आणि तिची बहीण पजामा परिधान करताना दिसत आहेत. ‘सिंघम’ अभिनेत्री काजल अग्रवाल सेलिब्रेरी मोडमध्ये दिसली आहे. फोटो सोबत असलेल्या कॅप्शनमध्ये काजलने लिहिले आहे की, ‘ आनंदाचा सोहळा असावा तर असा.
यापूर्वी काजलने दसऱ्याच्या निमित्ताने तिच्या होणाऱ्या नवरा गौतम किचलूबरोबरची पहिल्यांदा फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत अत्यंत सुंदर दिसत होते. फोटो मध्ये काजल आणि गौतमची जोडी अप्रतिम दिसत होती. या फोटो द्वारे काजलने चाहत्यांना दसराच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
30 ऑक्टोबर रोजी काजलचे लग्न होणार आहे. काजलच्या घरात हळद व मेहंदी कार्यक्रम 29 ऑक्टोबर रोजी एक दिवस अगोदर होणार आहेत. हे समारंभात वधू आणि वर दोघेही एकाच बाजूला असतील. काजलने 6 ऑक्टोबरला तिच्या लग्नाबद्दल सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं होतं. ज्यानंतर तिचे चाहते खूप आनंदित झाले आणि तिला खूप शुभेच्छा दिल्या.
काजल आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग ही खूप आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत कार्यरत असते. तिच्या लग्नाच्या अधिक माहितीसाठी आपण तिला इन्स्टाग्रामवर फोल्लो करू शकता.