गौरी कुलकर्णी (अभिनेत्री,ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण)
मागच्या काही वर्षांत माझं नृत्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. मला येत्या वर्षात, पुन्हा एकदा कथ्थक शिकण्यावर भर द्यायचा आहे. कथ्थकच्या उरलेल्या परीक्षा लवकरात लवकर देता याव्यात हा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे, ‘नृत्याच्या शिक्षणाकडे नीट लक्ष देणं’ हा माझा येणाऱ्या नव्या वर्षातील संकल्प असेल. तुम्हाला सर्वांना, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!
निखिल दामले (अभिनेता, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण)
मी व्यायामाच्या बाबतीत बराच आळशी आहे. येणाऱ्या नव्या वर्षात, हाच आळशीपणा झटकून टाकून मी नियमित व्यायाम करायचं ठरवलं आहे. हाच माझा येत्या नव्या वर्षाचा संकल्प असेल. आपण अनेकदा नवीन वर्षाचा संकल्प करतो आणि तो पूर्ण करणं आपल्याला जमत नाही. असं माझ्याकडून सुद्धा झालेलं आहे. यावेळी मात्र मी, तसं होऊ देणार नाही. नियमित व्यायाम आणि जिमिंग करण्याचा संकल्प मी पूर्ण करणार आहे.
अभिजित श्वेतचंद्र (अभिनेता, साजणा)
प्रत्येकजण नव्या वर्षाचा काही ना काही संकल्प करत असतो. मीदेखील यावर्षी एक संकल्प करणार आहे. २०१९च्या वर्षात माझं वाचन कमी झालेलं आहे, ते २०२०च्या वर्षात वाढवण्याचा माझा प्रयत्न असेल.
मला पार्टीला जायला फारसं आवडत नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री मी घरीच असणार आहे. बरोबर १२ वाजता आईवडिलांना नमस्कार करून मी माझ्या वाचनाला सुरुवात करणार आहे.
मला पार्टीला जायला फारसं आवडत नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री मी घरीच असणार आहे. बरोबर १२ वाजता आईवडिलांना नमस्कार करून मी माझ्या वाचनाला सुरुवात करणार आहे.