नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. सगळीकडे उत्साहाचे, मंगलमय वातावरण आहे… प्रत्येकाच्या घरी हा उत्सव वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. अखंड नंदादीप, रोज फुलांची माळसकाळ-संध्याकाळ आरती यामुळे सगळ वातावरण प्रसन्न होऊन जाते… सगळीकडे लवकरच देवीचे आगमन होणार आहे, आरास, सजावटीचे सामान सगळीकडे दिसून येत आहे… कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये देखील सिध्दी देवीचे धुमधडाक्यात स्वागत करणार आहे. सिध्दीच्या माहेरी बर्‍याच वर्षांपासून घटस्थापना होते आहे आणि यावर्षीदेखील गोकर्णाच्या घरी देवीचे आगमन होणार आहे…पहिल्या दिवशी गोंधळ असणार आहे… देवीच्या आशीर्वादाने सिध्दी – शिवाच्या नात्यामध्ये आलेला दुरावा दूर होईल हेच सोनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे मागणे देवीकडे असणार आहे… तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा नवरात्री महारविवार विशेष भाग २७ सप्टेंबर रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

सिद्धी आणि शिवाचे नाते कुठेतरी चांगले होत आहे असे वाटत असतानाच त्यांच्या नात्यात पुन्हा दुरावा आला आहे. सिध्दी काकु आणि सोनीसमोर खूप मोठा खुलासा करते. सिद्धी त्या दोघींना सांगते शिवाच्या वागणुकीमध्ये झालेला बदल हे निव्वळ पक्षकार्य होते, तो फक्त नाटक करत होता आत्याबाईंना दिलेल्या शब्दाखातर बाकी काही नाही आणि हे सगळे तिने स्वत:ऐकले आहे. तेंव्हापासून सिध्दी काय तर सोनी आणि काकु देखील शिवाच्या या वागणुकीमुळे खूप दुखावल्या आणि त्यांनी शिवाशी बोलणे सोडले आहे… आता सिध्दीने केलेल्या खुलास्यानंतर शिवा करत असलेले पक्षकार्य सगळ्यांना कळाले आहे… पक्षकार्य म्हणून तरी शिवा सिध्दीच्या घरी नवरात्रीसाठी हजेरी लावणार आहे.. यामध्ये मंगल कुठला नवा गोंधळ घालणार ? शिवा आणि सिध्दीचे नाते आणि त्याचे घरातील इतर सदस्यांसोबत असलेले नात सुधारेल ? त्यासाठी शिवा काय करेल ? हे येत्या काही भागांमध्ये कळेलच…