परिचय
नाव- निलेश मधुकरराव राणे (युवा क्रीडा मार्गदर्गक)
वनिलाचेनाव – मधुकरराव रामदास राणे 
आईचेनाव- रजनी राणे 
जन्म स्थळ- भुसावळ(महािाष्ट्र)
काययस्थळ- नानशक(महािाष्ट्र)
जन्म नदनाांक- १५/०१/१९८८

आपल्या खेळाची संस्कृती जपावी म्हणून निलेशचा ग्रामीण ते आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रवास

 

हातमजुरी करणारे वडील आणि शेती काम करणारी आई यांच्या काबाडकष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा होत असे होत असे,अशातच उपवर मुलीच्या विवाहाची चिंता घरात डोकावत होती. मात्र तशाहीपरिस्थितीत आपल्या मुलाने या राहाटगाड्यात न अडकता त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशोशिखर गाठावे, यासाठी कायम प्रोत्साहन देणाऱ्या मातापिताच्या ऋणातून उतराई व्हायची धडपड करणारा, ग्रामीण भागातून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचलेला खेळाडू व युवा क्रीडा मार्गदर्शक म्हणून आपली स्वताची ओळख निर्माण व वाटचाल करणारा आणि सध्या सर्व सामान्य खेळाडूंच्या परिस्थितीची झळ त्यांच्या क्रीडा कौशल्याला बसु नये यासाठी झगडणारा खेळाडू आणि महाराष्ट्रातील एकमेव उद्योग्मुख युवा क्रीडा मार्गदर्शक म्हणजेच निलेश मधुकरराव राणे.

लहानपणापासून निलेशला क्रिकेट व व्हॉलीबॉलची प्रचंड आवड होती. मात्र,वयाने लहान असल्यामुळे शालेय संघात निवड होणे हे दुर्लभच होते.! अशातच वारंवार आपल्या खेळाची चुणुक त्याच्या शाळेतील क्रीडा शिक्षकांपर्यंत पोहचविण्याची धडपड निलेश करीत होता. अखेर वयाच्या ११व्या वर्षी त्याच्या प्रयत्नांना यश आले, क्रीडाशिक्षकांच्या नजरेचा वेध घेणाऱ्या निलेशने क्रीडा क्षेत्रातील आपली कामगिरीही त्यांच्या विश्वासाला खरी ठरणारी करून दाखविली.

त्यानंतर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत दाखाविलेल्या क्रीडाची चुणूक निलेशला विभागीय पातळीपर्यंत घेऊन गेली, पुढे एका क्रीडा चाचणीचे वृत्त निलेशला कळले,अत्यंत आनंदाने चाचणीच्या ठिकाणावर गेल्यानंतरमात्र,तेथे नाममात्र शुल्क असल्याचे कळल्याने निलेश नाराज झाला.कारण त्यावेळेस तेवढेही शुल्क भरण्याची त्याची परिस्थिती नव्हती.आई वडिलांना हि सर्व बाब कळल्यावर स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तेआपल्याला या क्रीडा चाचणीसाठी पैसे देतील, त्यामुळे त्याने घरी काहीच सांगितले नाही.

त्यानंतर आपल्याप्रमाणेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गुणवंत खेळाडूंना मन मारून आपले क्षेत्र सोडावे लागत असल्याचा विचार त्याच्या मनात डोकावला. यासाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे, असे मनोमन वाटुन निलेश त्यादिवशी घरी परतला.

तिथूनच त्याचा खरा संघर्ष सुरु झाला. आपल्या काकांच्या दुकानात काम करून काकांना मदत करायला त्याने सुरुवात केली. काकांनी यापूर्वीही निलेशला प्रोत्साहनपर आर्थिक मदत केली होती तसेच शिक्षणासाठीही शुल्क भरण्यास मदत करायचे ,मात्र आता पुढे निलेशला स्वकमाईतून त्याचे विश्व निर्माण करायचे होते. त्यासाठी भुसावळ व काकांच्या दुकानातील काम एवढे पुरेसे नसल्याची जाणीव होताच, नेसत्या वस्त्रानिशीभुसावळ सोडून नाशिकला बहिणीचे घर गाठले.

नाशिकला जाऊन छोट्या-मोठ्या कंपन्यातून कामास सुरुवात केली, तर दुसरीकडे आपल्या क्रीडा कौशल्याने नाशिकमधील विविध क्रीडा मार्गदर्शक आणि हितचिंतक यांना निलेशने आपली दखल घेण्यास भाग पाडले.त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने निलेशने राज्य स्तरापर्यन्त मजल मारली. पुढे निलेश कर्तुत्व लक्षात घेत राज्य, तसेच राष्ट्रिय स्तरावरील अनेक संघटनानी त्याला विविध जबाबदारी सोपवल्या, त्या यथार्तपणे पार पाडल्याची पावती म्हणून विविध स्तरावरून निलेशचा यशोचित गौरवही करण्यात आला.

हे सर्व कार्य सुरु असतांनाच आपल्या मूळ ध्येयपूर्तीसाठी निलेशने व्ही.एम.डब्लू या क्रीडा संस्थेची स्थापना केली. याच संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण व गरजू खेळाडूंना अचूक प्रशिक्षण व मार्गदर्शन करून त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविण्याचे कार्य सध्या निलेश आवडीने करत आहे आणि त्याचा बालपणीपासूनचा छंद तो जोपासत आहे, तसेच नाशिक मधील विविध शाळा, महाविद्यालये यांचे क्रीडा अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतांना निलेशने स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविले आणि त्यासोबत राज्यातील खेळाडूंनी व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी  निलेशला राज्याचा एकमेव उत्कृष्ट युवा क्रीडा मार्गदर्शक म्हणून उपाधी दिली

भारतभर विविध राज्यांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर निलेशचे काही संघ यश मिळवत आहे, तसेच भारताबाहेर सुद्धा भारत संघांसाठी निलेशच्या अनेक खेळाडूंची निवड होत आहे. आणि ते खेळाडू आपल्या लाडक्या प्रशिक्षकासाठी उत्तम कामगिरी करून निलेशचे ध्येय पूर्ण करत आहे

आज व्ही.एम.डब्लू.या संस्थेअंतर्गत नाशिक शहरात तसेच राज्यातील हजारो खेळाडूंना मार्गदर्शन करणारे काही स्पोर्ट्स क्लब सुरु केलेत आहेत त्यात निलेश हा आपला वेळात वेळ काढून न विसरता राज्यातील खेळाडूंना स्वतः मार्गदर्शन करत असतात. सामाजिक भान जोपासत प्रायोजकत्व देणारे विविध संस्था, कंपन्या यांच्याशी निलेश नेहमी सातत्याने संपर्कात आहे, अर्थात या क्रीडा क्षेत्राच्या सामाजिक कार्यासाठी निलेशला सहकार्याच्या शेकडो हातांची गरज भासत असल्याचे तो सांगत आहे.

निलेशचे पुढील ध्येय

यापुढेही आपल्या व्ही.एम.डब्लू. संस्थेद्वारे ग्रामीण ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडू तयार करण्याचे कार्य निलेशला करायचे आहे. त्यासाठी राज्यच नव्हे तर देशभरात आपल्या संस्थेच्या शाखा उभारूनदेशभरातील आर्थिक कमकुवत क्रीडारत्न शोधण्याचे व त्यांना योग्य व्यासपीठ व योग्य मार्गदर्शन देण्याचे त्याचे स्वप्न आहे. एकूणच क्रीडा क्षेत्रासाठी आपले जीवन वाहून देण्याचा त्याचा ध्यास आहे.

निलेशची आतापर्यंतची कारकीर्द

  • मुख्य संचालक व्ही.एम.डब्लू. स्पोर्ट्स क्लब
  • राष्ट्रीय सहसचिव भारतीय शालेय क्रीडा सांस्कृतिक उपक्रम महासंघ
  • राज्य क्रीडा संचालक भारतीय शालेय क्रीडा सांस्कृतिक उपक्रम महासंघ
  • राज्य क्रीडा समन्वयक भारतीय शालेय क्रीडा सांस्कृतिक उपक्रम महासंघ
  • सहसचिव मुंबई क्रिकेट अकॅडेमी
  • मुख्य प्रशिक्षक भारतीय आंतर-१९ व्हॉलीबॉल संघ
  • राज्य प्रशिक्षक– भारतीय टेनिसबॉल क्रिकेट महासंघ
  • प्रशिक्षक मुंबई क्रिकेट अकॅडेमी
  • क्रीडा अधिकारी नामांकित महाविद्यालये

निलेशचे आतापर्यंतचे पुरस्कार

  • आंतरराष्ट्रीय बेस्ट-हुनर पुरस्कार (नेपाळ)
  • राष्ट्रीय क्रीडा-संघटक पुरस्कार  (महाराष्ट्र)
  • राष्ट्रीय स्टार-ऑफ-इंडीया पुरस्कार  (मुंबई)
  • राष्ट्रीय लोकमित्र पुरस्कार (महाराष्ट्र)
  • राष्ट्रीय क्रीडाभूषण पुरस्कार (महाराष्ट्र)
  • राष्ट्रीय उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (दिल्ली)
  • राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार (गोवा)
  • राष्ट्रीय बेस्ट हुनर पुरस्कार (उत्तर प्रदेश)
  • राज्य क्रांतीसूर्य पुरस्कार (महाराष्ट्र)
  • राज्य क्रांतिवीर सावरकर क्रीडागौरव पुरस्कार (महाराष्ट्र)
  • राज्य पुण्य-भूषण पुरस्कार (महाराष्ट्र)
  • क्रीडा गौरव पुरस्कार (.भा..से..महाराष्ट्र)

 

 

शिक्षक दिनानिमित्त ९ सप्टेंबर २०१७ पणजी (गोवा) येथे उत्कृष्ट शिक्षक राज्य पुरस्कार सोहळ्यासाठी श्री.निलेश राणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांचा विशेष पुरस्काराने सत्कार……