सई म्हणतेय ‘ती YZ आहे

sai

 

सई म्हणतेय ‘ती YZ आहे’ मुंबई : सई ताम्हणकर म्हणतेय ‘बिनधास्त सांगा मी YZ आहे.’ बाप रे! सई हे काय म्हणत्ये? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर घाबरू नका. कारण हे तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. २०१५ साली लेखक दिग्दर्शक समीर विद्वांस आणि क्षितीज पटवर्धन त्यांचा ‘डबल सीट’ हा सिनेमा घेऊन आले होते. हीच जोडगोळी आपला ‘YZ’ हा चित्रपट आणत आहे. भावना आणि विनोद याचे अनोखे मिश्रण या चित्रपटात असणार आहे. एका ३३ वर्षीय ‘वयात येणाऱ्या’ तरुणाची ही कथा असणार आहे. एका लहानशा गावात शिक्षक असणारा गजानन पुण्यात येतो आणि बत्तीस या १८ वर्षीय मैत्रिणीसोबतची त्याची मैत्री त्याला एका नव्या दुनियेत नेते. १ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सई मात्र या चित्रपटाचं प्रमोशन करताना ‘बिनधास्त सांगा मी YZ आहे’ असं म्हणायला सांगतेय.

Y Z

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here