‘सैराट’ने तोडले कमाईचे मराठीतील सर्व रेकॉर्ड

Sairat kamai

 

सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे.

 

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच झिंग चढली आहे. अजय-अतुलच्या संगिताने सजलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात आतापर्यंत तब्बल २५. २५ कोटींची कमाई केली आहे.

 

 

 

नटसम्राटला टाकलं मागे

यापूर्वी  एका आठवड्यात नटसम्राटने १५ कोटी रुपये कमाई केल्याचा विक्रम होता. पण तो विक्रम सैराटने न केवळ तोडला. पण आणखी १० कोटी २५ लाखांची बक्कळ कमाई करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

 

५० कोटी आकडा गाठणार

सैराट नावाचं वादळ ज्या प्रकारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर घोंगावत आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात ५० कोटी रुपयांचा आकडा सैराट पार करेल अशी शक्यता सिने विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here