ajay atul on rinku

 

महाराष्ट्रात झिंगाट करणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमातून प्रसिद्धीस आलेली रिंकू राजगुरुला या सिनेमात संधी कशी मिळाली हे तुम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल.

 

रिंकूचं ऑडिशन झाल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे हे रिंकूला त्यांच्या घरी घेऊन गेले. नागराज मंजुळे यांनी रिंकूकडे हात दाखवून म्हटलं की, ही आहे आपल्या सिनेमाची अर्ची.

 

नागराज मंजुळे यांनी ज्यांना हात दाखवून सांगितलं की ही आपल्य़ा सिनेमाची अर्ची आहे ते होते अजय-अतूल. अजय-अतूल यांना पाहून अर्चनाला देखील थोडा शॉकच बसला. अजयने रिंकूला पाहिलं आणि बोलले की, ही पोरगी काम करणार होय हिरोईनचं ? कदाचित अजय-अतूल यांना ही कल्पना आली नसावी की रिंकू हा रोल इतका सुंदरपणे करु शकेल.

सिनेमा जेव्हा पूर्ण झाला आणि रिंकूचा अभिनय पाहून अजय गोगावले म्हणतात की, आर्चे तू खूप सुंदर काम केलंयस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here