सगळीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ह्या दोघांच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगली आहे. आनंदाचे क्षण असो की दुःखाचा प्रसंग आलिया नेहमी रणबीर सोबत दिसून येते. त्यांच्या प्रेमाचे वारे सगळीकडेच जोरात वाहताना दिसून येत आहेत. लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा ही रंगत आहेत.

अशातच आलियाचे नववधूच्या वेषातील काही फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ह्या फोटोवरून रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांनी दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज बांधला आहे. आलियाचा जवळचा मित्र आणि अभिनेता वरुण धवन पाठोपाठ आलीया ही खरंच बोहल्यावर चढणार आहे का?

वरुण धवन-नताशा दलाल लग्नाला हजेरी लावलेल्या प्रसिद्ध मेहंदी कलाकार वीणा नागदाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर आलियासोबत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आलियाने हेवी लेहेंगा परिधान केला असून तिच्या हातावर मेहंदी दिसत आहे.

फोटो शेअर करत वीणा ह्यांनी लिहिले आहे की “सुंदर आलिया सोबत जाहिरातीच्या सेटवर.” ह्यावर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले आहे, “आलीया आतापर्यंतची सर्वात सुंदर नववधू असेल.” तर एका चाहत्याने म्हणले आहे, “आलिया नववधूच्या वेषात खूप सुंदर दिसते.”

ह्या पूर्वी ही अनेकवेळा आलिया आणि तिचा प्रियकर रणबीरच्या संभाव्य विवाहाबद्दल बरेच अंदाज वर्तवले गेले आहेत. जेव्हा हे जोडपे कुटूंबियांसह राजस्थानला गेले तेव्हा तर त्यांच्या चाहत्यांना खात्री झाली की हे अत्यंत खाजगी पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. पण तसे झाले नाही.

आलियाने झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की तिला तिच्याबद्दल उठणाऱ्या ह्या अफवा ‘खूप मनोरंजक’ वाटतात. ती म्हणाली, “सध्या माझ्याबद्दल कोणती अफवा आहे याची मला खात्री नाही. मला असे वाटते की प्रत्येक तीन आठवड्यांनी लग्नाची नवीन तारीख किंवा अफवा येते. मला ते खूप मनोरंजक वाटते आणि त्याने माझे केवळ मनोरंजन होते.”

रणबीरने पत्रकार राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत लवकरच आलियाशी लग्न करायचे आहे याची खातरजमा केली. तो म्हणाला, “जर ही महामारी नसती तर आम्ही केव्हाच लग्न केले असते. मला काहीही बोलून हे बिघडवायचे नाही. माझ्या आयुष्यात मी लवकरच लग्न करू इच्छितो. “

रणबीर आणि आलियाने लॉकडाऊन एकत्र घालवला असून नुकताच तिने रणबीरच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये एक फ्लॅट खरेदी केल्याचे वृत्त आले होते. पिंकविलाच्या माहितीनुसार, रणबीर 7व्या मजल्यावर राहतो तर आलियाने त्याच वास्तू पाली हिल कॉम्प्लेक्सच्या 5व्या मजल्यावरील जागा 32 कोटींमध्ये खरेदी केला आहे. योगायोगाने, हा टॉवर कपूर कुटुंबाच्या कृष्णा राज बंगल्याजवळ आहे.