झी युवाची ‘सोन्याचा मिस्ड् कॉल’ कॉन्टेस्ट

दिवाळीत घरबसल्या हजारो रुपये आणि सोन्याची नाणी जिंकण्याची ‘सुवर्ण’ संधी

झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, हे समीकरण दृढ आहे. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे, त्यांच्या भावविश्वाशी जोडणारे कित्येक कार्यक्रम हा झी नेटवर्कचा श्वास आहे.  वाहिनी वेगळी असली तरी प्रत्येक वाहिनीचा बाज हा कुटुंबातील प्रत्येकाच्या मनोरंजन आणि माहितीस्रोताचा धागा. या धाग्याने महाराष्ट्रातील लाखो कुटुंब एका वेगळ्याच नात्याने गुंफली आहेत. प्रेक्षकांच्या सुखदु:खाचे एकेक क्षण, सणसमारंभाचे सोहळे यामध्येही झी वाहिनीने आपला सहभाग दिला आहे. याच परंपरेला पुढे नेत झी युवा आपल्याला ‘सोन्याचा मिस्ड् कॉल ‘कॉन्टेस्ट द्वारे हजारो रुपये आणि सोन्याची नाणी जिंकण्याची संधी घेऊन आली आहे.

 ‘सोन्याचा मिस्ड् कॉल ‘ही एक अनोखी स्पर्धा केवळ झी युवाच्या प्रेक्षकांसाठीच आहे. ऐन दिवाळीत घरबसल्या हजारो रुपये आणि सोन्याची नाणी जिंकण्याची ‘सुवर्ण’ संधी झी युवा वाहिनी घेऊन आली आहे. ही स्पर्धा १६ ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे. या स्पर्धेमध्ये दररोज संध्याकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत प्रेक्षकांना प्रत्येक मालिके दरम्यान प्रश्न विचारले जातील आणि या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन हजारो रुपये आणि सोन्याची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी विचारलेल्या प्रश्नाच्या समोर २ पर्याय दिलेले असतील आणि त्यांच्यासमोर १८०० १२० १४०२ किंवा १८००१२०१४०३ हे दोन मोबाईल नंबर असतील. तुम्हाला केवळ योग्य पर्यायाच्या समोरील मोबाईल नंबर वर एक फ्री मिस्ड् कॉल द्यायचा आहे. आहे ना सोपं!  आणि तुमचं उत्तर अचूक असेल तर तुम्ही निवडले जाल हजारों रुपयांच्या बक्षिसांसाठी. तर मग १६ तारखेपासून झी युवावर रोज ७:३० वाजता फुलपाखरू, ८ वाजता अंजली , ८:३० वाजता  लव्ह लग्न लोचा , ९ वाजता जिंदगी नॉट आउट , ९:३० वाजता रुद्रम आणि १० वाजता गर्ल्स हॉस्टेल या सर्व लोकप्रिय मालिकांचा आस्वाद घ्या आणि मालिकेदरम्यान  विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देऊन बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा .