Zee Yuva’s Shaurya Gatha

 

Zee Yuva’s Shaurya Gatha

शौर्य – गाथा अभिमानाची “

वेगवेगळे गुन्हे आणि वेगवेगळ्या तपास पद्धती

नागरिकांच्या रक्षणाचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने बजावत असताना, काही गुन्हे असे घडतात, की ते उलगडताना पोलिसांच्याचातुर्याची कसोटी लागते. कधीकधी अशा तपासात काही संवेदनशील पैलू समोर येतात आणि गुंता आणखीच  वाढत जातो. या आठवड्यात  झी युवावर “शौर्य – गाथाअभिमानाची ”  मालिकेत पाहायला मिळणाऱ्या दोन्ही गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत. पहिली केस हि महिला पोलीस अधिकारी मीना पाटील यांची ,  नाशिक मध्येएका निर्जन रस्त्यावर मॅकेनिक राजेंद्र जगदाळे नामक व्यक्तीच्या खुन झाला पण  याचे काहीच धागेदोरे सापडत नव्हते ; संशय मात्र त्याच्याच नातेवाईकांवर  होता.

हि केस ज्या हुशारीने मीना पाटील यांनी सोडवली याची दाद दिली पाहिजे आणि दुसरी कथा आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांची . एक २४ वर्षाची मुलगीसोलापूरहून पहिल्यांदाच मुंबईमध्ये स्वतःच स्वप्न पूर्ण करायला आली होती आणि मुंबईत उतरता क्षणीच तिच्यावर एका तरुणाने ऍसिड हल्ला केला. पोलिसांचातपास सुरु झाला पण दरम्यान ती मुलगी मेली पण पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावले आणि त्या क्रूर तरुणाला सोलापूरमधून  पुराव्यांसकट शोधून काढले. या दोन्हीकथा शुक्रवार दिनाक २७ जानेवारी आणि शनिवार दिनाक २८ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पाहायला मिळतील.

 Sautya Gatha Abhimanachi

राजेंद्र जगदाळे नाशिक मध्ये एक मॅकेनिक होता . बायको ज्योती आणि मुलगी सुप्रिया हे त्याच कुटुंब . राजेंद्र चा मेव्हणा प्रवीण हा एक सक्रिय गुंड होता .आणि त्याची बायको मंगला हि त्याला पूर्णपणे साथ देत होती . जेव्हा राजेंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा पोलिसांना या सर्वच नातेवाईकांचा संशय आला . पण पुरावामिळत नव्हता .महिला पोलीस अधिकारी मीना पाटील या केसची  कसून चौकशी करत होत्या . त्यांची टीम प्रत्येकावर पाळत ठेवून होती . आणि शेवटी ठोस पुरावेमिळायला सुरु झाले ज्योतीचे विवाह बाह्य संबंध होते , मुलगी सुप्रियाचे ३  प्रेम प्रकरणं  सुरु होते , तर प्रवीण बरोबर राजेंद्रचे पैशावरून नेहमीच खटके उडत होते.पोलिसांनी कल्पकतेने एका एक पुरावा जमवत कश्याप्रकारे हि केस  सोडवली आणि आरोपीपर्यंत मीना पाटील कश्या  पोहचल्या हे आपल्याला या शुक्रवारी दिनांक२७ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पहायला मिळेल .

Sautya Gatha Abhimanachi Zee Yuva’s

मुंबई बाहेरून हजारोंच्या संख्येने लोक या मायानगरीत आपलं स्वप्न पूर्ण करायला येतात . प्राची जगताप हि त्यातलीच एक .सोलापूरहून नोकरीसाठीमुंबईमध्ये आलेलय प्राचीला मुंबईत  तीच असं स्वागत होईल असं  स्वप्नातही  वाटलं नसेल . अतिशय हुशार अशी प्राची मुंबईत नोकरीसाठी आली आणि आल्याआल्या एका अज्ञात तरुणाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला . त्यातच तिचा जीव गेला . वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मात्र हे मनावर घेतले . प्रेमप्रकरणकिंवा प्रेमभंग  या दिशेने तपास सुरु असताना संशयाची सुई तिचे तुटलेल्या लग्नातील नवऱ्यावर होती. पण तो मात्र निरपराध निघाला . तिच्यावर ऍसिड हल्ला काझाला याबद्दल काहीच पुरावा मिळत नव्हता . पण एकेदिवशी पोलिसांच्या हाती अशी एक गोष्ट मिळाली त्यामुळे अपराधी हा सोलापूरचाच आहे हे स्पष्ट झाले पणकोण हे कळले नव्हते . शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी एक युक्ती केली आणि प्राचीच्या तेराव्याच्या दिवशी पोलिसांना  क्रूर गुन्हेगार सोलापूर मध्येचगवसला. हि थरारक गोष्ट   शनिवार  दिनांक २८ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पहायला मिळेल .

Zee Yuva’s Sautya Gatha Abhimanachi

या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंटचे सचिन मोहिते, तर लेखन लेखक अभिजीत पेंढारकर यांनी, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here