Shiv & Gauri (Rishi Saxena & Sayali Sanjeev) From Kahe Diya Pardes’ & Nupur (Prajakta Mali) from ‘Naktichya Lagnala Yaycha Ha’ joined this fun-filled ‘Shobha Yatra’

गुढीपाडवा…मराठी नववर्षाचा सण. मुंबईतील गिरगावमध्ये तर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. ढोल ताशांच्या गजरात, रांगोळ्याच्या रंगरंगोटीने सजलेली आणि पारंपरिक वेशभूषेने नटलेली शोभायात्रा तर या उत्सवाची शान असते.

या सोहळ्यात मराठी परिवार मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. याच सोहळ्यात सहभाग घेतला झी मराठीच्या कलाकारांनी. ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील शिव (ऋषी सक्सेना) – गौरी (सायली संजीव) आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेमधील नूपुर (प्राजक्ता माळी) या कलाकारांनी या शोभायात्रेत हजेरी तर लावलीच शिवाय ढोल वाजवत त्या नादात रंगूनही गेले

Shiv ,Gauri & Nupur Celebrate Gudhi Padwa Dhol Tasha Photos