राधा म्हणजेच वीणा जगताप का म्हणतेय – आणि ती गोष्ट घडली !!!

 कलर्स मराठीवर उद्यापासून राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका उद्यापासून सुरु होत आहे. मालिकेमधील राधा म्हणजे वीणा जगताप मालिकेबद्दल खूपच उत्सुक आणि आनंदी आहे. तिची हीमुख्य भूमिका असलेली पहिलीच मालिका असून तिने प्रेक्षकांबरोबर तिचे काही अनुभव शेअर केले आहेत. पहिलीच मालिका ती पण कविता लाड -मेढेकर, सचित पाटील, शैलेश दातार यांसारख्या कलाकरांबरोबर करायलामिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. या सगळ्यांनी मला काही दिवसातच स्वीकारले याचा मला खूप आनंद आहे. खूप काही गोष्टी या सगळ्यांकडून मला शिकायला मिळत आहेत. पहिल्याच मालिकेमध्ये मला कलर्समराठीमुळे राजेश मापुसकर यांच्याबरोबर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. याच दरम्यान त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीदेखील शिकता आल्या. त्यांनी आमच्या मालिकेचे शीर्षक गीत अप्रतिमरीत्या दिग्दर्शित केले आहे.त्यांच्याकडून शिकता आलेली पहिली आणि महत्वाची बाब म्हणजे Dedication” आणि दुसरी म्हणजे अशक्य असे काहीच नाही”. अभिनय क्ष्रेत्र असो वा दुसरे कुठलेही या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात असं मलावाटतं.

आम्ही सेटवर खूप धम्माल मस्ती करतो, याचबरोबर मला सहकलाकारांकडून खूप गोष्टी शिकायला देखील  मिळत आहेत. खासकरून कविता लाड, सचित आणि ऋग्वेदी प्रधान यांच्याकडून. काहीही झालं तरी १०० % पेक्षाजास्त dedication ने काम करायाचे ही खूप महत्वाची गोष्ट मी सचित पाटील कडून शिकले. काम हे नेहेमी पूर्ण Focus देऊन करावे, कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये हे कविता लाड – मेढेकर यांनी मला सांगितले.  मीआणि आमच्या संपूर्ण टीमने या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि आता ही मालिका उद्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, Finally ही गोष्ट घडली याचा मला खूप खूप आनंद आहे.