Suresh Wadkar & Swapnil Bandodkar IN Sargam – Music Show 22,23 March

सुरेश वाडकर आणि स्वप्नील बांदोडकर ह्यांच्या सुमधुर आवाजाने महाराष्ट्र मंत्रमुग्ध होणार !!! २२ मार्च आणि २३ मार्च ला सरगम प्रेक्षकांचा उचांग गाठणार

Zee Yuva झी युवाचा “सरगम” हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.त्यांचे नियोजित कार्यक्रम सोडून सध्या या कार्यक्रमाकडे पाहण्याचा ओघ वाढतआहे . सरगम मध्ये आजपर्यंत  संगीत क्षेत्रातील दिग्गज नावांनी ह्या व्यासपीठावर येऊन त्यांची कला लोकांसमोर एका वेगळ्या रूपात आणली आहे . शंकर महादेवनयांच्यापासून झी युवावर  सुरु झालेला हा संगीतमय प्रवास , आनंद शिंदे, आदर्श शिंदे ,लोकशाहीर  नंदेश उमप यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे  .

याआठवड्यात २२ मार्च  आणि २३ मार्च ला सरगम प्रेक्षकांचा उचांग गाठणार आहे . बुधवार २२ मार्च ला  रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा एपिसोडआहे तर गुरुवार २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता स्वप्नील बांदोडकर हे आपली कला सादर करणार आहेत .  गोड गळ्याचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर आणितरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा स्वप्नील बांदोडकर यांचे एकामागोमाग एक गायकी अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांसाठी चालून आली आहे.स्वप्नील बांदोडकरया नावाची खरतर वेगळी अशी ओळख करून द्यायची गरजच नाही. सुमारे शंभर मराठी चित्रपट आणि विविध भाषांमधील पाचशेहून अधिक गाणी गाणारा स्वप्नीलमराठीमधला सर्वात लोकप्रिय गायक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

पण फक्त मराठीच नव्हे तर हिंदी, बंगाली, आसामी, गुजराती, तामिळ, भोजपुरी आणिओरिया अशा अनेक भाषांत त्याच्या सुरील्या आवाजाची जादू रसिकांवर पसरली आहे. सध्याच्या नविन पिढीवरच नाही, तर जुन्या पिढीच्या ओठी पण हल्ली त्याचीचगाणी आढळत आहेत तर सुरेश वाडकर हे तर स्वप्नील चे गुरु . जर शिष्य एवढा गुणी असेल तर गुरुची माहिती काय ती सांगावी . सुरेश वाडकरांचा बॉलीवूड मधीलदबदबा मोठा आहे . त्यांनी गायलेली लागी आज सावन की “, “तुमसे मिल्के  ऐसा लगा “, छोड आये हम वोह गलीया … ही आणि अशी असंख्य गाणी वर्षोनवर्षे संगीतक्षेत्रात अजरामर आहेत .. हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये पार्श्वगायन करताना आणखी अनेक भाषांमध्ये त्यांचे प्रभुत्व आहे  आणि असेही सुरेश वाडकर यांच्याबद्दलकोणाला माहित नाही असा प्रेक्षक महाराष्ट्रात सापडणे कठीण. सरगम या कार्यक्रमात नवीन टायलेंट म्हणून त्यांच्या आजीवासनमधील दोन शिष्यांसोबत गाणार आहेतआणि त्यातील एक शिष्या दुसरी कोणीही नसून सुरेश वाडकर यांची मोठी मुलगी अनन्या आहे. बुधवार २२ मार्च च्या एपिसोड मध्ये महेश कोठारेंची एक विशेष एन्ट्रीसुद्धा असणार आहे.

सरगम या कार्यक्रमात सुरेश वाडकर दयाघना , हृदयी प्रीत जागते , जिथे सागरा धरणी मिळते , पहिले ना मी तुला , रश्मे उल्फत , झन झान छेदिल्या तारा , ओह है जरा खफा खफा , प्रियतम्मा ,अग अग पोरी फसलीस ग  , कानडा राजा पंढरीचा , विठ्ठल आवडी  ह्या गाण्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहेत तर स्वप्नील बांदोडकर मला वेड लागले , केव्हा तरी पहाटे , तुला पाहिले, हा चंद्र तुझ्यासाठी , स्वर आले दुरुनी , गालावर खळी आणि  राधा हि बावरी या गाण्यांनी वेड लावणार आहेत . २२ आणि २३ मार्च  बुधवार आणि गुरवार रात्री ९ हे प्रेक्षकांना एक स्वर्गीय आनंद देतील .

सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत .”सरगम” या कार्यक्रमाच्यासूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे  शीर्षक गीतशंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणिगुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.

Suresh Wadkar & Swapnil Bandodkar  Sargam Music Show Photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here