कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये ढोल – पथक !

सरस्वती मालिकेमध्ये गणपतीचे आगमन धुमधडाक्यात झाले. गणपतीच्या आगमनाने सगळीकडेच प्रसन्न वातावरण होते. बाप्पाच्या आगमनानंतर सरस्वतीने त्याच्या महाप्रसादासाठी ११०१ मोदक देखील केले. सरस्वतीच्या हरतालिकेच्या पूजेपासून ते बाप्पाच्या प्रसाद करण्यापर्यंत विद्युलने तिच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केलापरंतु सरस्वतीने विद्युलच्या प्रत्येक प्रयत्नांना उलटून लावून बाप्पाच्या आगमनामध्ये कुठल्याहि प्रकारची कमतरता भासू दिली नाही. गावातील गणपतीच्या आरतीचा मान देखील सरस्वतीला मिळाला. पण, आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. मुळातच बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे सरस्वतीसमोर आलेली विघ्न देखील तो दूर करेलतिला तो मार्ग दाखवेल आणि कशी सरस्वती अडचणी मधून बाहेर येईल हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सरस्वती कलर्स मराठीवर संध्या ७.वा. बाप्पाच्या विसर्जनासाठी सरस्वती मालिकेमध्ये ढोल पथक आणण्यात आले आहे. ज्यामध्ये सरस्वती देखील पारंपरिक पद्धतीने तयार झाली असून तिने पांढरा पंजाबी ड्रेसपिवळ्या रंगाची ओढणीनाकामध्ये नथ आणि फेटा असे सगळे परिधान केले आहेज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसते आहे. मालिकेमध्ये ढोलताशा बरोबर धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे.

 

गणपती विसर्जनाच्या दिवशी राघवला दुखापत करण्याचा कट विद्युलने रचला आहे त्यासाठी तिने मिरवणुकीमध्ये मारेकरीला देखील पाठवले आहे. याआधी देखील विद्युलने असा राघवला मारण्याचा प्रयत्न केला होता. पणयावेळेस राघवला दुखापत करण्याच्या प्रयत्नात विद्युलला यश मिळेल देविका बोलू शकते हे सत्य राघवला कसे कळेल ? सरस्वतीला विद्युलचे सत्य कळल्यावर ती काय करेल हे बघणे रंजक ठरणार आहे. गणपती बाप्पा सरुच्या आयुष्यातील हि विघ्न लवकरच दूर करेल हे नक्की.

 

तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती कलर्स मराठीवर संध्या ७.०० वा.