aaaa

 

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणा-या सैराट चित्रपटावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय.

सैराट चित्रपटाने ज्याप्रमाणे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

या चित्रपटांवरचे जोक्स, फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. सैराट चित्रपट आल्यानंतर सैराट टू येणार असल्याच्या चर्चाही सोशल कट्ट्यावर चांगल्याच रंगल्यात.

याची कहाणीही सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवर सध्या सैराट पार्ट टूची कथा रंगतेय.

सैराट टूची कहाणी 

आता ही कोणी अफवा पसरवली की ” सैराट २ ” येतोय…..

मला आलेली “सैराट २” ची स्टोरी…. नागराज मंजुळे सर सगळ्याना झिंगाट करुन सोडला की लगा तुम्ही…..

सैराट -2

आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो
त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात
त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो

Interval

आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात

The End
( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं )
पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला
( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here