Upcoming Marathi Movie Gachchi 2017 Priya Bapat | Abhay Mahajan

अभय – प्रियाच्या डिजिटल वॉर मधून झाले ‘गच्ची’ सिनेमाचे टीझर लाँच

‘Gachchi’, a film presented by Landmarc Films and produced by Nitin Vaidya Productions is all set to release on December 22, 2017 all across Maharashtra. Known for making quality films, Vidhi Kasliwal this time has associated with Nitin Prakash Vaidya and they are all set to gift their audiences ‘Gachchi’ this Christmas.

Recently the teaser of the film was launched on social media in a quirky manner. ‘Gachchi’ marks the directorial debut of Nachiket Samant and the first time coming together of lead pair Priya Bapat and Abhay Mahajan. Priya and Abhay initiated a twitter banter leading up to the teaser launch. The teaser exhibits glimpses of Priya and Abhay on a Gachchi (terrace) with a strange exchange of dialogues.

Written by Yogesh Vinayak Joshi, ‘Gachchi’ with its simplicity will most certainly create curiosity in the cine-goers.

Get ready for ‘Gachchi’ this December.

अभय – प्रियाच्या डिजिटल वॉर मधून झाले ‘गच्ची’ सिनेमाचे टीझर लाँच
‘गच्ची’… म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता येतो. म्हणूनच तर, सुख असो वा दुख, मानवी भावभावनांना वाट करून देणारी ही ‘गच्ची’ प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हीच ‘गच्ची’ आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित ‘गच्ची’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून,  ‘गच्ची’ चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून, गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाचे कुतूहल अधिक वाढलेले दिसून येत आहे. 
योगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली  असेल, यात शंका नाही.