मे च्या दिवशी पहा झी युवावर जल्लोष प्रेमाचा

“प्रेम हे Prem He” ची पुढील प्रेमकहाणी

महाराष्ट्र दिन , मराठी बाणा आणि या सगळ्यात गुंग झालेली मराठमोळी तरुणाई हे चित्र आपल्याला  महाराष्ट भरात महाराष्ट्र दिनानिमित्त नेहमीच दिसूनयेते . आजही आधुनिक होत असलेला तरुण आपली मूल्ये जपतो . सणवार तेवढ्याच प्रेमाने साजरे करतो .दिसण्यात आधुनिक असलेल्या तरुणीही असे सणआल्यावर आपल्याला नऊवारीत दिसतात .

झी युवाचा प्रेक्षक असलेला असा हा तरुण आधुनिक आहेच पण तेवढाच पारंपरिक सुद्धा . महाराष्ट्र दिनानिमित्त  “प्रेम हे Prem He” ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे “जल्लोष प्रेमाचा  “. येत्या सोमवारी  १ मे च्या निम्मिताने एक मराठमोळी गोष्ट  झी युवा आपल्यासाठी घेऊन येत आहे . हामहाराष्ट्र दिनानिमित्त असलेला विशेष भाग सोमवार १ मे आणि २ मे ला रात्री ९ वाजता रुचिरा जाधव  आणि अक्षय वाघमारे  यांच्या तगड्या अभिनयाने सजलेली एकसुंदर निरागस अस्सल मराठमोळी  प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.

मुक्ता जहागीरदार आणि विक्रांत मोहिते या दोघांची ही अस्सल मराठमोळी कहाणी . मुक्ता जी अतिशय मॉडर्न पण भरपूर समंजस तर विक्रांत हा भारतीयसंस्कृतीत रुतलेला , कणखर पण तेवढाच स्वभावात मृदू असा एक रांगडा मराठी मुलगा . या प्रेमकहाणीत दोन भिन्न विचारांची लोक जेव्हा एकमेकांना न समजतागैर समज करतात आणि मग चूक समजताच तेवढ्याच उत्कटतेने एकमेकांवर प्रेम करायला लागतात . पण त्यांचे हे प्रेम त्यांना मिळते का ? नक्की काय गैरसमजहोतात . महाराष्ट्र दिन त्यांच्यासाठी नक्की काय घेऊन येतो ? हे पाहण्यासाठी जल्लोष प्रेमाचा पाहावेच लागेल .

“जल्लोष प्रेमाचा ” ही झी युवाची संकल्पना असून  रुचिरा जाधव  आणि अक्षय वाघमारे  हे मुख्य भूमिकेत आहेत, तर स्वप्नील गांगुर्डे यांच्या लेखणीतूनकथा साकारली आहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे यांनी केले आहे. दर सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता वेगवेगळ्या कथांतून  “प्रेम हे Prem He”  झी युवावर उलगडतजाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here