one-way-ticket-review



  • Movie Review : One Way Ticket (2016)
  • Producer : Madhu Nathani, Kamal Nathani
  • Directer : Kamal Nathani
  • Studio : KNC Production, Mahalasa Entertainment, Mekbrand – Click Flick Films
  • Star Cast : Shashank Ketkar, Amruta Khanvilkar, Sachit Patil, Gashmeer Mahajani, Neha Mahajan

One Way Ticket  Marathi Movie Review

‘वन वे तिकीट’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची कथा पाच व्यक्ती व एका शानदार क्रुझवरील प्रवासावर आधारित आहे. क्रुझवर चित्रीत करण्यात आलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि इटली,फ्रान्स, स्पेन  यांसारख्या शहरातील शूटिंग हा पहिला मुद्दा आहे आणि ससपेन्स थ्रिलर हा दुसरा मुद्दा आहे जो प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता ताणतो.

क्रुझवरील प्रवासात वाढणा-या अनपेक्षित घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवतील असे चित्रीकरण करण्यात आले आहे.  हा चित्रपट म्हणजे एक प्रवास आहे, काही एकत्र येणाऱ्या गोष्टीचा, नियतींचा…एक थरारक, रोमांचक प्रवास.




One Way Ticket (2016) Marathi Movie Mp3 Songs Free Download

या प्रवासातील पाच व्यक्ती म्हणजे अनिकेत (शशांक केतकर), हा मुळचा पुण्यातील पिंपरी येथे राहणारा. पैशांची जुळवाजुळव करुन भारताबाहेर कामासाठी निघतो, मात्र परदेशी पूर्ण गोंधळून गेला आहे.

आदित्य राणे (नीगश्मीर महाज) हा स्मगलर आहे. मुंबईच्या एका जीममध्ये शिवानी (अमृता खानविलकर) आणि आदित्यची ओळख होते आणि नंतर दोघे प्रेमात पडतात आणि काही दिवसांत त्यांचे लग्न पण ठरलेले असते.

समर राज (सचित पाटील) आणि उर्वशी (नेहा महाजन) हे दोघे ब्लॉगर आहेत. अशी या पाच प्रवासांची ओळख. या पाच जणांचे ठिकाण जरी वेगळे असले तरी ते क्रुझवर एकत्र असतात. खरं तर काही पात्रांची ओळख देखील लपवली आहे, का आणि कशासाठी?

या कथेतील आणखी एक रहस्यमय गोष्ट म्हणजे रुम नंबर ६२६२… हा सगळा काय प्रकार आहे…संपूर्ण कथा गोंधळून टाकणारी आहे. या प्रवासाचा रहस्यमय प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी वन वे तिकीट प्रवास एकदा तरी अनुभवा.

one-way-ticket

या चित्रपटातील लोकेशनसह गाण्यांनी पण मन जिंकले आहे. ‘बेफिकर’ आणि ‘रेश्मी रेश्मी’ या गाण्यांना जास्त पसंती मिळेल याची खात्री वाटते. खरं तर पाचही गाण्यांना प्रेक्षकांकडून लाईक्स नक्कीच मिळतील.

याचे श्रेय अश्विनी शेंडे, मंदार चोळकर,गौरव डगांवकार, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, रोहित राऊत, श्रीनिधी घटाटे, क्षितीज वाघ, अरुणिमा भट्टाचार्य, शीफा हरीस यांना जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here