Oli Ti Maati Lyrics Song Photocopy  Latest Marathiओली ती माती ओला तो गंध
ओली ती सांज तुझा सुगंध
माझ्या मनात एक तू
माझ्या श्वासात एक तू
पानात तू दवात तू
रोम रोमातच तू
सरीत तू लहर तीच तू
ओली ती माती ओला तो गंध
ओली ती सांज तुझा सुगंध ….

माझी न मी राहे पाहूनी तुला रे
आतुरले किती मी, मिठीत घे मला रे
मेघ कसे दाटले बरसुनी तू येना रे (twice)
ओली ती माती ओला तो गंध
ओली ती सांज तुझा सुगंध…..

ढगांचा स्पर्श मृदुलतो
रविला ही लपवतो
मंद वारा वाहतो
चांद खुशीत हासतो
ओठात मी गुणगुणू
कानात तू रूणुझुणू
ऊन ही तू सावली तू
इंद्रधनू तू
पहाटेचा समीर तोच तू

ओली ती माती ओला तो गंध
ओली ती सांज तुझा सुगंध….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here