Maze Rani Sod Abola Song | Tu Ka Patil Marathi Movie | Ashish Natekar & Sadhana Sargam

Maze Rani Sod Abola Song Download,Tu Ka Patil Marathi Movie,Ashish Natekar & Sadhana Sargam

 • Song Name : Maze Rani Sod Abola…
 • Movie : Tu Ka Patil (Marathi)
 • Director : Matchindra Chate
 • Lyrics : Yogiraj Mane
 • Music : Rajesh Sarkate
 • Singers :Ashish Natekar & Sadhana Sargam गीत
  तो – माझे राणी सोड अबोला जाऊ अपुल्या गं घरी अगं किती दिवस मी करून खाऊ हाताने भाकरी…
  ती – लाडीगोडी नकोस लावू राहा तू एकटा घरी कायम आता करून खा तू हाताने भाकरी…
  तो – कसा दुरावा सहन करू मी समजेना एक घासही मला का गोड अगं लागेना ? अबोल झाले घर हे सारे बघ ये राणी तू घरी किती दिवस मी करून खाऊ हाताने भाकरी…
  ती – का माझ्याशी भांडण करतो सांग मला? दूर राहू या आपण दोघे सजा तुला आनंदाने राहते राजा मी बाबांच्या घरी… कायम आता करून खा तू हाताने भाकरी…
  तो – तू आल्यावर गाणे गाऊ सुरात गं एक चिमुकला तान्हा येईल घरात गं बारा महिने करीन राणी मी तुझीच गं चाकरी… किती दिवस मी करून खाऊ हाताने भाकरी…
  ती – रोजच बघते मीही राजा स्वप्न नवे जे जे वाटे तुला हवे ते मला हवे तुला मी पहिले आणि प्रेमाच्या लाख बरसल्या सरी… चल जोडीने आनंदाने जाऊ अपुल्या घरी…
  तो – चल जोडीने आनंदाने जाऊ अपुल्या घरी…
  तो व ती – चल जोडीने आनंदाने जाऊ अपुल्या घरी…