kon-hoeel-marathi-crorpatichya-manchavar-sindhutai-sapkal




Kon Hoeel Marathi Crorpatichya Manchavar Sindhutai Sapkal

Kon Hoeel Marathi  कोण होईल मराठी करोडपतीच्या महामंच्यावर सिंधुताई सपकाळ
“स्वत:च्या सुखात इतरांचे दु:ख विसरू नका”- सिंधुताईनी दिला मोलाचा सल्ला

संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्याबद्दल आदर आहे आणि ज्या “अनाथांची माई” म्हणून
ओळखल्या जातात अश्या महाराष्ट्राच्या लाडक्या Sindhutai Sapkal सिंधुताई सपकाळ नुकत्याच कोण होईल मराठी
करोडपतीच्या महामंच्यावर आल्या.

आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई
सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना
आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या
आहेत.

Kon Hoeel Marathi  कोण होईल मराठी करोडपतीचा हा विशेष भाग १४ नोव्हेंबर म्हणेज बालदिनच्या दिवशी प्रेक्षकांना
बघायला मिळणार असून यादिवशी Sindhutai Sapkal सिंधुताई सपकाळ यांचा वाढदिवस देखील असतो.

kon-hoeel-marathi-sindhutai-sapkal-swapnil-joshi

 

कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर सगळ्यांनाच सिंधुताईंना बघून आनंद झाला. यावेळेस त्यांनी अनेक
अनुभव, जुन्या आठवणी प्रेक्षकांसमोर मांडले तसेच अनेक मोलाचे सल्लेदेखील दिले. “स्वत:च्या सुखात
इतरांचे दु:ख विसरू नका” असा मोलाचा सल्ला सिंधुताईनी जमलेल्यांना सगळ्यांनाच दिला.
तेंव्हा बघायला विसरू नका कोण होईल मराठी करोडपती १४ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता फक्त कलर्स
मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here