kaul-manacha-2016-marathi-movie



  • Movie : Kaul Manacha (2016) | कौल मनाचा
  • Director : Bhimrao Mude
  • Producers : Rajesh Suklal Patil, Vitthal Hanumant Rupanwar, Narashi Vasani
  • Star Cast : Amruta Patki, Rajesh Shringarpure, Sameer Dharmadhikari, Milind Gunaji, Vijay Chavan, Jaywant Wadkar, Vijay Gokhale, Varsha Dandale, Kamlesh Sawant, Shweta Pendse, Ashutosh Gaikwad, Girija Prabhu, Ninad Tambde, Ganesh Sonawane

 

Kaul Manacha 2016 Marathi Movie  Review

समाजातील आणि एकूण आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील परिस्थितीचा लहान मुलांच्या मनावर होणारा परिणाम हा विषय प्रत्येकासाठी गंभीर असू शकतो. या विषयाची गंभीरता पाहता आपण सर्वांनी आपल्या पाल्याचे योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

असा हा गंभीर विषय ‘कौल मनाचा’ Kaul Manacha या चित्रपटात हाताळण्यात आला आहे.

कौल म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहित आहे. आपला एखादा मानस पूर्ण व्हावा यासाठी देवाला कौल लावण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पण ‘कौल मनाचा’ या चित्रपटामध्ये कौलचा अर्थ कोणत्या अर्थाने घेतला आहे हा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित होतो.

चित्रपटाची कथा जस जशी उलगडत जाईल तस तसा मनाचा कौल किंवा कौल मनाचा अर्थ स्पष्ट होईल.  ‘कौल मनाचा’ ही बालमनाच्या कंगो-याचा वेध घेणारी कथा आहे.  देवाला लावलेला कौल ते आपल्या मनालाच विचारलेला प्रश्न हा प्रवास या चित्रपटामध्ये दिसतो.

Kaul Manacha 2016 Marathi Movie  Mp3 Songs Free Download




Kaul Manacha 2016

चित्रपटाची कथा आयुष्याच्या प्रत्येक फ्रेम मध्ये सिनेमा जगणारा राज कुंडल (आशुतोष गायकवाड) या व्यक्तिरेखे भोवती फिरते. आगाऊ स्वभावामुळे त्याला शालेय शिक्षणासाठी घरापासून दूर हॉस्टेलमध्ये ठेवण्यात येते. शिक्षक ओरडतील अशीच कामं तो करत असतो.

अशातच त्याच्या आयुष्यात अत्यंत देखणी आणि सुस्वभावी शिक्षिका हेमा (अमृता पत्की) येते. राजला हेमा आवडू लागते आणि शिक्षिका हेमाला जे आवडेल ते तो करु लागतो. शिक्षक दिनाच्या दिवशी हेमाच्या वेशात त्याची वर्ग मैत्रीण रितिका (गिरीजा प्रभू) येते आणि नंतर राजला रितीका आवडू लागते.

राज तिच्याविषयी असलेलं प्रेम रितिका समोर व्यक्त करतो, मात्र रितिकाला हे अजिबात आवडत नाही. कारण रितिकाला प्रथमेश (निनाद तांबडे) आवडत असतो ज्याचा राजशी ३६ चा आकडा असतो. पण सर्व काही विसरुन राज त्या दोघांना मदत करतो. इथून सुरु होतो एक नवा प्रवास.  या नव्या प्रवासात काय घडतं आणि राजच्या कथेत अजून कोणाची एण्ट्री होते हा उत्सुकतेचा विषय आहे. राज रितिका आणि प्रथमेशला मदत करतो म्हणजे नक्की काय करतो? या नव्या प्रवासात इन्सपेक्टर कोणाचा शोध घेतो हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘कौल मनाचा’ हा चित्रपट पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here