Kanha Marathi Movie Review

 

चित्रपटाच्या माध्यमातून एखाद्या विषया संबंधित विविध पैलू मांडणे देखील आजच्या काळात महत्त्वाचे ठरत आहे. कारण चित्रपट हे माध्यम समाजाचा आरसा म्हणून पण संबोधले जाते. समाजात घडणा-या गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्यावर त्याविषयीचे महत्त्व हे काही प्रमाणात लोकांना पटते किंवा निदान त्यावर विचार तरी केला जातो. प्रताप सरनाईक निर्मित आणि अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘कान्हा हा ‘दहीहंडी’ या विषयावर आणि खेळावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आहे.



 

‘गोपाळकाला’, मुळांत पाहिलं तर श्रावणमासात येणारा हा एक सण. आपल्या लाडक्या कृष्णाला बालगोपाळांनी दहीहंडी फोडून दिलेली मानवंदना. पण गेल्या काही वर्षात यातला सण मागे पडला आणि जीवघेण्या इर्षेने या निरागस खेळात प्रवेश केला आणि इर्षा होती ती जास्तीत जास्त थरांचा मानवी मनोरा लावून सगळ्यात उंच दहीहंडी फोडण्याची.

साहजिकच नंतर या इर्षेचा फायदा घेतला तो काही राजकीय नेत्यांनी. त्यामुळे या सणाला वेगळं रुप आलं,

Kanha 2016 Marathi Movie Song Free Download

 



 

लाखो रुपयांची बक्षिसे वाटू जाऊ लागली. तसेच या सणाला इव्हेंटचं स्वरुप देण्यात आलं, या झगमगाटात सच्चा गोविंदा मात्र मागे राहिला. दहीहंडीचा थरार बघता-बघता आता गोविंदाच्या जीवावर बेतायला लागला. गोविंदाच्या जीवाची सुरक्षा लक्षात घेऊन न्यायालयाने या उत्सवावर आणि यात रचल्या जाणा-या थरांच्या संख्येवर बंधने आणली. या सर्व परिस्थितीवर ‘कान्हा’ हा चित्रपट भाष्य करतो.

kanha review

‘कान्हा’ या चित्रपटाच्या कथेतील प्रमुख पात्र आहेत रघु आणि मल्हार. रघु आणि मल्हार स्वत:च्या दोन मंडळातील वाद यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांच्यामधील वादाचं मुळ कारण आहे ‘राजकारण’. राजकारणचा या खेळामध्ये होणारा हस्तक्षेप आणि हे राजकारण एका बालगोविंदावर कसं येतं हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

 

या चित्रपटाच्या माध्यमातून गश्मीर महाजनी आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकली आहे. तसेच त्यांच्यासोबत अभिनय करणारे कलाकार प्रसाद ओक, गौरी नलावडे, किरण करमरकर आणि सुमेध वाणी यांचे काम पाहण्याजोगे आहे. विशेष करुन गौरी नलावडे एका डॅशिंग भूमिकेत आहे तर बालकलाकार सुमेध वाणी याचे सुध्दा काम मनापासून आवडेल असे आहे.

Kanha 2016 Marathi Movie Song Free Download

या चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये पण यश मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे आणि चित्रपटाची मांडणी देखील योग्य पध्दतीने केली आहे. संपूर्ण चित्रपट पाहायला मजा येते असं म्हणायला आवडेल. या चित्रपटातील गाणी हे देखील विशेष आकर्षण बनले आहे. कारण या चित्रपटातील गाण्यांमुळे चित्रपटाला एक वेगळे रुप आल्याचे जाणवते. तरुणांमध्ये असलेली दहिहंडीच्या उत्साहाची झिंग मांडणारी गाणी आहेत.

Kanha 2016 Marathi Movie Song Free Download

दहीहंडी हा खेळ, उत्तम कलाकारांचा उत्तम अभिनय, अवधूत गुप्ते यांचे दिग्दर्शन याचा सुंदर अनुभव अनुभवयाचा असेल तर ‘कान्हा’ नक्की पाहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here