ग्लोबल बॉक्स ऑफिसवर  ‘गोलमाल अगेन’ ने केले 300 कोटी रुपयांची कमाई!

गोलमाल अगेनने बॉलीवूड बॉक्स ऑफिसच्या आतापर्यंतच्या सर्वकाळाचा रेकॉर्ड तोडला आहे. अल्पावधीतच या सिनेमाने अनेक विक्रमांची नोंद केली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या चित्रपटांमध्ये ‘गोलमाल अगेन’ अव्वल स्थानावर असून, या चित्रपटाने जगभरातून 300 कोटी रूपयांचा बक्कळ गल्ला कमावला आहे. या चित्रपटाने भारतातील नेट बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा पल्ला पार केला असून, भारतातील व्यावसयिक चित्रपटाच्या दृष्टीने ‘गोलमाल अगेन’ सर्वोत्कृष्ट 10 हिंदी चित्रपटांमध्ये गणला जात आहे. शिवाय दि ग्रेट इंडियन कॉमेडी पिक्चर ठरलेला हा सिनेमा उत्तर अमेरिकेतील ऑल टाइममध्ये मोठ्याप्रमाणात पाहिला जात आहे. शिवाय या चित्रपटामुळे गुजरातमधील बॉक्स ऑफिसवरील मागील सर्व विक्रम मोडीत निघाले असून, अभिनेता अजय देवगणचा पहिला आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीचा भारतात दुसरा 200 कोटींची कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

‘गोलमाल अगेन’ ला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याने प्रेक्षकांना धन्यवाद देताना म्हंटले की, ‘चित्रपटाला मिळत असलेल्या सिनेरसिकांच्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी त्यांचे ऋणी असून, जगभरातील माझ्या सर्व प्रेक्षकांचा मी आभारी आहे.’ तसेच, रिलायन्स एन्टरटेन्मेंटचे सीओओ शिबाशिश सरकार यांनी सांगितले की, “बॉक्स ऑफिसवर असे अद्भूत विक्रम करणारे चित्रपट खूप कमी आहेत. मात्र, रोहितने ते शक्य करून दाखवले, त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत.’