ga-sahajani-diwali-celebration




Tv Serial : Ga Sahajani | ‘गं सहाजणी’

एम.यू.पी बॅंकेत झाला हास्याचा दिवाळी महाबोनस  

ga-sahajani-tv-serial-teem

महिलांची हक्काची बॅंक अशी अल्पावधीतच ओळख बनवणाऱ्या एम.यू.पी. बॅंकेत सध्या उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळसणानिमित्ताने या बॅंकेतील सर्व कर्मचाऱ्यांना आगळावेगळा महाबोनस मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या स्टार प्रवाह Star Pravah वाहिनीवरील ‘ग सहाजणी’ Ga Sahajani या मालिकेतील मंजुळाबाई उसने परतफेड बॅंकेने नुकताच हास्याचा दिवाळी महाबोनस जाहीर केला.

ga-sshajani-logo

महिलांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेतील  कामिनी, मीना, दामिनी, सुश्मिता, भीमा आणि जुबेदा या सहा मैत्रिणींनी मिळालेलया हास्याच्या या महाबोनसचा मनसोक्त आनंद लुटला. बॅंकेच्या गेटटुगेदर पार्टीत रंगलेल्या महिलांच्या विविध स्पर्धेत या सहाजणींनी पुरेपूर बक्षिसाची लयलूट केली. इतकेच नव्हे तर, बॅंकेचे खडूस मॅनेजर धबडगावकर वर्सेस ‘गं सहाजणी’ अशी चुरशीची स्पर्धा देखील यात रंगली.

प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘ग सहाजणी’  Ga Sahajani च्या या दिवाळी स्पेशल एपिसोडचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. ‘ग सहाजणी’ Ga Sahajani चा हा एपिसोड दिवाळी धम्माल गाजवणारा असल्यामुळे चित्रीकरणासाठी बॅंकेची सुंदर सजावट करण्यात आली होती.

दिवाळीला घराची ज्यापद्धतीने महिला सजावट करतात तशीच सजावट एम.यू.पी बॅंकेत या सहाजणींनी मिळून केली होती. नोकरी करणाऱ्या महिलांचे ऑफिस हे देखील एक कुटुंब असते, त्यामुळे आपल्या ऑफिसची झाडलोट आणि सजावट करण्यासाठी या सहाजणींनी कंबर कसली होती. बॅंकेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी, तोरण, प्रकाशदिवे, कंदील आणि पणत्यांची आरास करत त्यांनी खऱ्या अर्थाने दिवाळसण साजरा केला.




Ga Sahajani

एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाली आहे. या मालिकेतील शर्वणी पिल्लई (मीना मोडक), नियती राजवाडे(दामिनी), नम्रता आवटे (जुबेदा), पोर्णिमा अहिरे(भीमा), सुरभी भावे (सुश्मिता) आणि मौसमी तोडवळकर (कामिनी) या प्रमुख  अभिनेत्रींनीं आपापल्या भूमिकेतून ‘गं सहाजणी’त रंग भरला आहे.  दिवाळी सणानिमित्त महिलावर्गात होणारी चर्चा, नट्टापट्टा, शॉपिंग तसेच रांगोळी… ! असे बरेच काही या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच नेहमीच दराऱ्याखाली आणि आपल्या मर्जीत ठेवणाऱ्या धबडगावकरांची या सहाजणी दिवाळी स्पेशल भागात कशी फजिती करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:

स्टार प्रवाह संपर्क :
विक्रांत जोशी 9833135448 [email protected]
हितेश आढाव 9769016680 [email protected]
अवदुंबर एंटरटेनमेंट संपर्क:
अमृता माने 9892931606 [email protected]

Ga Sahajani Diwali Celebration / photos / hd wallpapers

pournima-ahire-sharvani-pillai-niyati-rajwade-girija-oak-surabhi-bhave-namrata-awate-mausami-tondalkar

 

digambar-naik-atul-tondankar-vinod-jadhav-and-shashikant-kerkar

 

mausami-tondalkar namrata-awate




niyati-rajwade surabhi-bhave girija-oak     pournima-ahiredirector-mahendra-kadam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here