बहुचर्चित  F.U.- Friendship Unlimited  चा Teaser Launch सोहळा संपन्न!!
सोशल मीडिया वर एका रात्रीत 10 लाखाहून जास्त व्ह्यूज झालेला  पहिला मराठी चित्रपट !!
Fresh Look , न संपणारी एनर्जी , रोमान्स ,तरुणाई चा atitude आणि full of life ने भरलेल्या या वर्षातील सर्वात धमाकेदार अशा F.U. या चित्रपटाचा भव्य Teaser Launch  सोहळा मुंबईत अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला आणि सोशल मीडिया वर काही तासांत 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झाले. F.U. च्या या पहिल्याच Look वर प्रेक्षक  अक्षरशः फिदा झाले आहेत.
        सैराट च्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषतः तरुणींच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर F.U. या चित्रपटातून एका ट्रेंडी लुक मध्ये आपल्या समोर येत आहे. आकाश बरोबरच या Teaser मध्ये  सत्या मांजरेकर , मयूरेश पेम , शुभम किरोडीयन , माधव देवचक्के ,पवनदीप ,वैदेही परशुरामी , संस्कृती बालगुडे , स्वामिनी वाडकर , रिया बर्मन , राधा सागर , मधुरा देशपांडे , स्वरदा ठिगळे या तरुण कलाकारांबरोबरच सचिन खेडेकर , मेधा मांजरेकर , शरद पोंक्षे , स्व. अश्विनी एकबोटे , भारती आचरेकर आणि महेश मांजरेकर या अनुभवी कलाकारांची फौज दिसते त्याचबरोबर बोमन इराणी आणि इशा कोप्पीकर हे बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत.
नटसम्राट , ध्यानीमनी या आशयघन चित्रपटानंतर  महेश मांजरेकर ,तमाम तरुणाई चे प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांचा आणि आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U  हा चित्रपट घेऊन येत आहेत.
बॉलीवूड मधील कलाकारांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील तगडे व्यावसायिक या चित्रपटाच्या  प्रदर्शनासाठी एकत्र आले आहेत, T.Series चे भूषण कुमार आणि किशन कुमार हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत त्यांची हि प्रसिद्ध संस्था या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे, त्याचबरोबर बॉलीवूड मधील अनेक भव्य आणि मोठ्या बॅनर चे चित्रपट आणि बाहुबली या चित्रपटाचे वितरक अनिल थडानी F.U.चे वितरण करीत आहेत . भूषण कुमार आणि अनिल थडानी यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.
     हा Teaser Launch सोहळा गाजला तो कलाकारांच्या विशेष सादरीकरणाने..  F.U. या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करणारे तरुण संगीतकार विशाल मिश्रा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल ‘यूलिया’ हिने बहारदार गाण्याचे सादरीकरण केले आणि त्यानंतर F.U. च्या धमाकेदार गाण्यावर आकाश ठोसर आणि सर्व तरुण कलाकारांनी नृत्याचा ठेका धरून सोहळ्याचा कळस गाठला.
    विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी अतिशय युथफूल आणि ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिजित देशपांडे यांच्या साथीने या चित्रपटाचे लेखन सुद्धा केले आहे. F.U. ची निर्मिती अभय गाडगीळ, महेश पटेल, दिनेश किरोडीयन आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे. आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U. – Friendship Unlimited हा भव्य चित्रपट येत्या २ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.