Dhaap “धाप “ चित्रपटाचा पहिला प्रोमो आज प्रदर्शित:
Dhaap ” धाप “ या नावातच सर्व काही आहे.धाप चित्रपटाचा त्याच बरोबर चित्रपटातील नायकाचा प्रवास जेवढा खडतर आहे,तेवढाच योगेश गाडगे या नवोदित अभिनेता,लेखक आणि दिग्दर्शक याचा आहे.
अनेक संकटाना आणि अडचणीना सामोर जात त्याने या चित्रपटाची निर्मिती केली आणि विशेष म्हणजे चित्रपटाला ‘दादासाहेब फाळके हा विशेष उल्लेखनीय २०१७ दिल्ली” चा पुरस्कार हि मिळाला.
याचं योगेश बद्दल थोडक्यात:
ज्याच्या घरी एक वेळ खायची भ्रांत असेल तो एखाद्या मोठ्या चित्रपटाचा दिग्दर्शक होऊ शकतो का..?
जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही हेच या मुलाने सिद्ध केल आहे.योगेश बबन गाडगे दिग्दर्शित “धाप- An unexpected journey of life” हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे,विशेष म्हणजे चित्रपटाची कथा,गीते त्याने स्वत:च लिहिली असून आशिष हाडवळे आणि सर्वेश मुनी या नवोदित संगीतकारांनी त्याला संगीत दिल आहे.शंकर महादेवन,आदर्श शिंदे,ज्ञानेश्व्र्र मेश्राम,आणि आशिष कुलकर्णी या दिग्गज गायकांनी चित्रपटातील गीते गायली आहेत.योगेश हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असुन त्याचा जन्म 14 ऑक्टोबर १९९१ साली निमगाव सावा या जुन्नर तालुक्यातील छोट्याशा गावात झाला,योगेश ६ वर्षांचा असताना आई वडील विभक्त झाले.अर्थात आज 20 वर्षा नंतर त्याने आई बाबांना पुन्हा एकत्र आणल आणि ते एकत्र राहतात.विभक्त झाल्या नंतर आई बहिण आणि तो जुन्नर तालुक्यातील आर्वी या मामाच्या गावात मामाकडे राहिले.तळ हाताच्या फोडाप्रमाणे आईने त्यांना लहानाच मोठ केल.आपण एक मोठा अभिनेता व्हायचं असं त्याने ठरवलंच होत,पण घरची परिस्थिती तशी नव्हती.श्री शिवनेर विद्यालय आर्वी येथे १० वी पर्यंतच शिक्षण तर श्री शिव छत्रपती कॉलेज जुन्नर येथे १२ वी सायन्स त्याने पूर्ण केल.गावाकडे असताना वीटभट्टीवर ५० पैशा ला २२ विटा वाहण्या पासुन ५० रु रोजाने दिवसभर शेतात काम करायला तो मागे धजावला नाही.आपल स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गाव सोडायला हव हे लक्षात घेऊन योगेश ने पुण्यातील मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर येथे बी.एस.सी रासायन शास्त्रा ला प्रवेश घेतला,पुण्यात राहण म्हणजे मोठ आव्हान होत,वर्गातल्या एका तेजस लोंढे नावाच्या मुलाशी ओळख झाली,तो हि गावाकडच्या बाजूचा असल्या कारणांन त्यान योगेश ला मदत केली तब्बल एक वर्ष योगेश त्याच्या बरोबर रूमवर भाड न भरता राहिला. त्याने B.sc  करत करत मिळेल ती नोकरी केली.क्रेडिट कार्ड काढून देणे,कॉल सेंटर मध्ये रात्री ची शिफ्ट,आणि पावसाळ्यात कमी भाड असलेल्या पत्र्याच्या रूम मध्ये शिरणार पाणी रात्री कामावरून आल्यावर २ वाजता काढायचं.सगळ्या गोधड्या भिजलेल्या असताना केवळ चप्पल काढतो त्या उंबरठ्या जवळ कोरडी जागा असायची तिथे पायाच कोडग करूनं झोपायचं.आणि सकाळी लवकर उठुण पुन्हा कॉलेज ला जायचं.
अगदी डी- मार्ट मध्ये कपड्याच्या घड्या घालायचं काम हि ७ महिने त्याने केल. हॉटेल म्यानेजमेंट झालेल्या मित्रांसोबत लग्नाच्या रिसेप्शन मध्ये वेटर म्हणून काम करायचं.३०० रु १५ दिवस कसे काढायचा देव जाणो,
सकाळी २० रु २ वडापाव आणि रात्री “अनलिमिटेड” जेवण असलेली मेस,भरपूर जेवायच कारण दिवस फक्त वडापाव वर निघायचा.पिंपरी चिंचवड च्या “मेक्डोनाल्ड”मध्ये हि त्याने एक दिवस हजेरी लावली.दिवसभर ३००-४०० प्लेट पुसल्या,हातात मॉब घेऊन लादी पुसली आणि ते उकळत्या तेलात “फ्रेंच फ्राइस” पण तळल्या.दुसऱ्या दिवशी आजारी पडला आणि तो पुन्हा गेलाच नाही.बी.एस.सी.झाल्यावर योगेश मुंबई ला गेला पण तिथे फक्त फसवणूक आणि पैशांची मागणी करणारे दुकान मांडून होते.एक दिवस एका माणसाचा फोन आला केसांच्या प्रोडक्ट ची जाहिरात आहे स सांगण्यात आल आणि त्याने योगेश चे सर्व केस बारीक करून टाकले.केस नसल्या मुळे आता ऑडीशन देण अवघड झाल,पुन्हा त्या माणसाचा कधीही फोन लागला नाही.जगात एवढी नीच लोक असतात याची प्रचीती तिथे आली.हताश होऊन योगेश पुन्हा पुण्याला आला आणि स्वतः काही तरी करायचं अस ठरवून त्याने फिल्म करायची ठरवल.फिल्म करत असतानाही त्याला काही साधा त्रास झाला नाही.अडीच वर्षे WNS कंपनी मध्ये नोकरी करत करतच ती पूर्ण झाली अर्थात कंपनीतले मित्र आणि सगळे साहेब साथ देणारे होते.मित्रांनो नशिबाला दोश न देता,आपल्या कर्मावर विश्वास ठेवा,यश नक्की मिळेल,आणि नाहीच मिळाल तर खचून जाऊ नका,सतत प्रयत्न करत रहा,कारण चित्रपट करत असताना अनेक अडचणी उभ्या होत्या सुरवात झाली तेव्हा योगेश ने जुबेर नावाच्या मित्राकडून 10 हजार रु उसने घेऊन सुरवात केली.पोटापुरती 18 गुंठे जमीन ती हि विकून चालणार नव्हत आणि त्यात फिल्म पूर्ण होण हि अशक्य होत. योगेश अनेक लोकानाभेटत राहिला,शेकडो लोकांना भेटल्यावर चंद्रकांत मोरे यांनी आणि अतुल जगताप यांनी त्याला आर्थिक मदत केली.त्याचीहि गोष्ट वेगळीच आहे.आणि अडीच वर्षानी “धाप” चित्रपट पूर्ण झाला,या चित्रपटाची “नाशिक फिल्म फेस्टिवल “कलकत्ता फिल्म फेस्टिवल “त्याच बरोबर मराठी चित्रपट सृष्टी मधला बहुमानाचा समजला जाणारा पुरस्कार ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल” मध्ये हि निवड झाली आहे.ध्येय पुर्तीसाठी झगडणाऱ्या योगेश गाडगे चा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
                                    – योगेश बबन गाडगे (लेखक-दिग्दर्शक-अभिनेता)