कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमधील अक्षय घाडगेने जिंकली प्रेक्षकांची मने !

घाडगे & सून मालिका परदेशामध्ये देखील फेमस

 कलर्स मराठीवरील ‘घाडगे & सून’ ही मालिका सुरु झाल्यापासूनच बरीच चर्चेत आहे. मालिकेमधील प्रत्येक पात्रं लोकप्रिय झालं आहे. उत्तम कथानक, अभिनेते यामुळे प्रेक्षकांना ही मालिका खिळवून ठेवते. ‘घाडगे & सून’ मालिकेमधील अक्षय घाडगे म्हणजेच सगळ्यांचा लाडका चिन्मय उद्गीरकर तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आता तर परदेशामध्ये देखील मालिका आणि अक्षयची भूमिका प्रेक्षकांचे मनं जिंकतं आहे. चिन्मय त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून त्याच्या पत्नीसह बाली आणि दुबईला जाऊन आला. तिथे त्याला मिळालेल्या प्रतिक्रिया त्याने शेअर केल्या ज्यावरून आपणं असं नक्कीच म्हणू शकतो कि, घाडगे & सून मालिका आणि अक्षयचे पात्रं लोकांचे मनं जिंकत आहे.

चिन्मयला विचारले असता त्याने या त्याच्या परदेशी ट्रीपमध्ये आलेल्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया शेअर केल्या. तो म्हणाला, “दुबईमध्ये महाराष्ट्र मंडळामध्ये कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने मी तिथे गेलो होतो… तिथे एक छोटी मुलगी माझ्याजवळ धावत आली आणि ती म्हणाली अरे अक्षयदादा कियारा शिमलामध्ये आहे तिला तिकडे शोध… तिने ज्याप्रकारे मी दिसताच माझ्याजवळ येऊन ही प्रतिक्रिया सांगितली त्यामध्येच सगळं काही दडलेलं आहे. माझ्यासाठी हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात भारी अनुभव होता. कारण, एका लहान मुलाने तुम्हाला तुमच्या पात्राच्या नावाने हाक मारणं हे खूप महत्वाचं असतं. आणि दुसरं म्हणजे लहान मुलांपासून सगळ्यांनाच ही मालिका आवडते आहे, हे देखील मला कळालं”.

तसेच बाली मध्ये असताना देखील मला असाच एक अनुभव आला. बालीमध्ये आम्ही चार दिवस गेलो होतो. पण तिथे काही कारणास्तव आम्हाला काही दिवसं अजून रहावं लागलं, त्यामध्ये फ्लाइट्स रद्द झाल्या त्यामुळे कुठे राहावे असा प्रश्न पडला, airpot पण बंद, जाण्या-येण्याची सोय देखील नव्हती. अश्यावेळेस एक मराठी कुटुंब भेटलं जे मला मालिकेमुळे ओळखतं होतं. त्यांच नावं वाळवणकर जे उद्योगपती आहेत त्यांनी मला त्यांच्याकडे बोलावून घेतलं. त्यांच्या घरी दोन इंडोनिशियन मुली आहेत आणि त्या मला बघताच क्षणी आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या “हाय अक्षय” याचा अर्थ त्या देखील घाडगे & सून ही आमची मालिका त्या परिवारासोबत बघतात. त्या पुढे म्हणाल्या “अक्षयने जो पाईपवर चढून कियाराला सोडविण्याचा प्रयत्न केला त्या भागामध्ये असं करू नका, असा सीन पुढे केलाच तर काळजी घ्या. हे ऐकून मला खूप बरं वाटलं आपण करत असलेल्या कामाची पावती मिळाली जी एखाद्या कलाकरासाठी खूप महत्वाची असते असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्रातच नाहीतर “घाडगे & सून” ही मालिका परदेशामध्ये देखील लोकप्रिय आहे असं मला वाटतं”.