ऑब्जेक्शन माय लव्ह – प्रेम हे ची नवीन कहाणी

एकतर्फी प्रेमाची आठवण  वेगळीच असते. ते सांगता येत नाही भासवता येत नाही . पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते योग्य त्या व्यक्तीला सांगणे महत्वाचेअसते आणि वेळ आली कि ते निभावणे सुद्धा  ही गोष्ट आहे दोन अश्या लोकांची जे आयुष्यातील एक वळण संपल्यानंतर आज अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांसमोर पणएकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत . प्रेम कधी कोणामध्ये आणि कोणत्या वळणावर होईल खरंच सांगू शकत नाही. “प्रेम हे” ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे”ऑब्जेक्शन माय लव्ह “. येत्या सोमवार २४ एप्रिल  आणि मंगळवार २५ एप्रिल ला रात्री ९ वाजता स्नेहा चव्हाण आणि चेतन चिटणीस यांच्या तगड्या अभिनयानेसजलेली एक सुंदर निरागस भांडखोर  प्रेमकथा झी युवावर पाहायला मिळेल.

दोन तरुण वकील प्रिया आणि निखिल त्यांच्या आयुष्यातील पहिली केस . दोघेही आपल्या आपल्या अशीलांसोबत केवळ विजयच मिळवायचा या इराद्यानेकोर्टरूम मध्ये येतात . पण गोची तेव्हा होते जेव्हा त्यांना कळते की ते दोघेही कॉलेज फ्रेंड्स आहेत आणि त्यातही निखिल चे प्रिया हे  पहिले प्रेम आहे . तेव्हापासूनचया कथेत गंमतींना सुरु होते .त्यात विजय गोखले सारखा अवलिया हा जज च्या भूमिकेत आहेत . केस सुरु होते आणि प्रेम ही . आणि जसं जसे केस पुढे पुढे जातेतस तसे प्रेम सुद्धा बहरत जाते . पण कोर्टातील प्रोफेशन वैयक्तिक आयुष्यात भारी पडते का ? किंवा प्रेमामुळे प्रोफेशन वर परिणाम होतो . प्रेमाच्या आणाभाकाघेतल्यानांनंतर प्रेम हे आयुष्यभर नेहमी तसेच राहते की वैयक्तिक अहंकार प्रेमावर भारी पडतो . अश्या या सर्व भावभावनांनी गुंफलेली एक गमतीदार कोर्टरूम कहाणीआहे  “ऑब्जेक्शन माय लव्ह ”

“ऑब्जेक्शन माय लव्ह ” ही झी युवाची संकल्पना असून  स्नेहा चव्हाण आणि चेतन चिटणीस  हे मुख्य भूमिकेत आहेत, विजय गोखले बऱ्याच काळानंतरछोट्या पडद्यावर दिसणार आहेत.  त्याचबरोबर सुरेंद्र केतकर , मंजुषा जोशी , श्रीरंग दाते , ज्योतीक चितळे तर स्वप्नील गांगुर्डे यांच्या लेखणीतून कथा साकारलीआहे आणि या गोष्टीचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे यांनी केले आहे. दर सोमवार-मंगळवार रात्री ९ वाजता वेगवेगळ्या कथांतून “प्रेम हे”झी युवावर उलगडत जाईल.

Chetan Chitnis And Sneha Chavan Photos