Chaurya Marathi Movie Reviews

 

‘चौर्य’ मुखवट्यामागील रहस्याचा थरारक शोध घेणारा

  • Movie Reviews : Chaurya Movie ‘चौर्य’
  • Producer : Nilesh Navalakha, Vivek Kajaria, Sameer Asha Patil & Ashwini Patil..
  • Directer : Sameer Asha Patil
  • Star Cast : Kishor Kadam, Milind Shinde, Ganesh Yadav, Pradeep Velankar, Digvijay Rohidas, Dinesh Lata




Chaurya (2016) Marathi Movie Song Free Download





मराठी सिनेसृष्टीत येणारा नवीन चित्रपट, नवीन आशय, एक वेगळी पठडी आणि नवा दिग्दर्शक हे सर्व जर एकाच चित्रपटात अनुभवयाचे असेल तर त्याचे सध्याचे उदाहरण म्हणजे ‘चौर्य’. समीर आशा पाटील या नव्या दिग्दर्शकाने चौर्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना थ्रिलर चित्रपट अनुभवयाला दिला आहे.

chaurya movie Reviews

 

‘चौर्य’ चित्रपटाची गोष्ट घडते देवमाळ या गावात. या गावात कोणत्याही घराला दारं नाहीत. कारण या गावात असा समज आहे की इथे चोरी होत नाही आणि जर चोरी झाली तर देव त्या चोराला शिक्षा देतो. त्यामुळे मंदिरातील दानपेटीलाही कुलूप लावले जात नाही. पण या गावातल्या देवाचा उत्सव असतो आणि अनेत भक्त देवाच्या दर्शनासाठी येतात आणि देवाच्या श्रध्देपोटी दानपेटीत दान टाकतात.

एकीकडे देवाच्या उत्सवात भक्त मग्न झालेले असतात तर दुसरीकडे काही चोर दानपेटी चोरण्याचा बेत आखत असतात याची टीप पोलिसांना मिळते. पण चोरीचा बेत इतका पूर्वनियोजन पध्दतीने करण्यात येतो की पोलिसांनी बंदोबस्त लावलेला असूनही पोलिसांच्या गर्दीत इतर काही मुखवटे घातलेले पोलिस पण असतात.

इतर काही मुखवटे म्हणजे अमिताभ बच्चन, श्रीदेवी, प्राण, अमरिश पुरी यांचे मुखवटे घातलेले पोलिस असतात आणि ते दरोडा घालून पोलिसांच्याच गाडीतून फरार झालेले असतात. या एकंदरीत प्रकरणाचा अजूनही छडा लागलेला नसतो आणि ‘कोण पोलिस आणि कोण चोर’ हा एकच गोंधळ गावात सगळीकडे उडालेला असतो.

Chaurya 2016

कोण चोरी करतं आणि का, तसेच मुखवट्या मागचं रहस्य काय याचे उत्तर हवे असेल तर ‘चौर्य’ नक्की पाहा.

चोर-पोलिस, त्यांच्यातील धावाधाव आपल्या सर्वांना माहित आहे. पण या चित्रपटात चोर-पोलिस यांच्यातील परिस्थितींवर करण्यात आलेल्या दिग्दर्शनात समीर पाटील यांना नक्कीच यश मिळाले आहे. समीर पाटील यांच्या दिग्दर्शनातून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे असे जाणवत नाही इतका अचूकपणा त्यांच्या दिग्दर्शनात पाहायला मिळाला आहे.

सततच्या फ्लॅशबॅकमुळे तोचतोचपणा आला आहे. मिलिंद शिंदे ,प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, गणेश यादव, , दिनेश शेट्टी, तीर्था मुरबाडकर या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चित्रपटात जान आणली आणि त्यांचा अभिनय चित्रपटाशी खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो.

पण सतत काही मोजक्या पोलिस पात्रांच्या भोवतालीच हा चित्रपट फिरतो आणि गावकरी त्यांच्या समस्या घेऊन मधेच हस्तक्षेप करतात. या चित्रपटाची मांडणी अजून चांगल्या पध्दतीने करण्यात यायला हवी होती. पण मराठी सिनेसृष्टीतील चित्रपटात रहस्यमय, थरारक कथा अनुभवयाची असेल तर ‘चौर्य’ नक्की पाहावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here