‘वर्ल्ड फूड डे’ च्या निमित्ताने हृताने शेअर केला एक छोटासा पण अर्थपूर्ण विचार

‘माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींची गरज असते’, हे आपण सर्वजण आपल्या शालेय जीवनात शिकलोय. १६ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अन्न दिवस’ (वर्ल्ड फूड डे) म्हणून साजरा केला जातो. #WorldFoodDay हा हॅशटॅग ज्या पध्दतीने सोशल मिडीयावर ट्रेण्ड झालेला आहे त्यावरुन या दिवसाचे महत्त्व आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल. मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने देखील या हॅशटॅगच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश अधोरेखित केला आहे.

आज ‘वर्ल्ड फूड डे’चे औचित्य साधून हृताने या विशेष दिवसाशी निगडीत एक छोटासा पण अर्थपूर्ण विचार एका व्हिडीयोच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये आपल्या सर्वांच्या आयुष्यात अन्न किती महत्त्वपूर्ण आहे आणि अन्न ग्रहण करताना आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर तिने तिचे मत मांडले आहे. तसेच सकस आहार घ्या आणि निरोगी राहा असा महत्त्वपूर्ण सल्ला देखील हृताने दिला आहे.

व्हिडीयो लिंक-

https://www.facebook.com/hrutad/videos/1879112795450126/

युवा प्रेक्षकांमध्ये देखील हृता विशेष लोकप्रिय होत आहे आणि हे सिध्द झालंय तिच्या व्हिडीयोला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादातून.  हृताच्या चाहत्यांची संख्या पाहता तिचा विचार नक्कीच त्यांना पटेल आणि ते देखील त्याचा विचार करतील याची खात्री वाटते.