सागरिकाच्या ब्रँड न्यू गाण्यासोबत साजरी करा यंदाची “दीपावली”
 
सागरिका म्युझिकचे नवे गीत “आली दीपावली आली”….
दिवाळी हा एक असा क्षण आहे जो नेहमीच आपल्या आयुष्यात नवीन आशा महत्वाकांक्षा क्षितिजे आणि स्वप्ने घेऊन येतो. दिवाळी दिव्यांचा तेजाचा सण जेव्हा प्रत्येकजण आपल्या घरात आशेच प्रतीक म्हणून एक तरी दिवा लावतोच मग तो गरीब असो, श्रीमंत अथवा मध्यमवर्गीय.
दिवाळीचा मुहूर्त साधत यावर्षीची दिवाळी अधिक तेजोमय करण्यासाठी सागरिका म्युझिक एका नवोदित संगीतकाराचे गीत आपल्यासाठी घेऊन आले आहे. या संगीतकाराचे नाव आहे सुहित अभ्यंकर. “आली दीपावली आली”….असे या गाण्याचे बोल असून हे गीत संगीता बर्वे यांनी लिहिले असून नव्या दमाच्या आशुतोष मुंगळे, ओंकारस्वरूप बागडे, निखिल मोडगी आणि ऋचा बोन्द्रे यांच्या सुमधुर आवाजाने या गीताला चार चाँद लागले आहेत.
गेल्या १९वर्षात आम्ही मराठी संगीतसृष्टीला अनेक कलाकार दिले आहेत. आम्हाला खात्री आहे सुहित  अभ्यंकर हे सागरिका म्युझिकने लाँच केलेल्या यशस्वी कलाकारांच्या यादीतील अजून एक नाव ठरेल.
हे गाणे आपण सागरिका म्युझिकच्या YouTube चॅनेलवर ऐकू शकता.