sairat11

सैराट’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिल्या दिवसापासूनच विक्रमी ठरले होते. २९ एप्रिलला ‘सैराट’ प्रदर्शित झाला त्या दिवशी ३. ६० कोटी, दुसऱ्या दिवशी ३.९५ कोटी, तिसऱ्या दिवशी ५.५५ कोटी असा गल्ला जमवत केवळ तीन दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम ‘सैराट’च्या नावावर लिहिला गेला. पहिल्या आठवड्यात २५.२५.कोटी रुपयांचा गल्ला जमला होता. आता या चित्रपटाचे चार आठवडे पूर्ण झाले असून चौथ्या आठवड्या अखेरीस ८१. १६ कोटीचा गल्ला भरला आहे.

 

केवळ दोन आढवड्यात ५० कोटी रुपयांची कमाई करणारा ‘सैराट’ एकमेव चित्रपट आहे. आजवर ‘सैराट’ने कमवलेल्या रक्कमेचा विक्रम कधीच घडला नव्हता. तिसऱ्या आठवड्यात १६ कोटी आणि चौथ्या आठवड्यात १५ कोटीची कमाई झाली. अशा तऱ्हेने चौथ्या आठवड्याच्या अखेरीस ८१. १६ कोटीची कमाई ‘सैराट’ने केली आहे.

 

‘सैराट’ चित्रपटाला ५ व्या आठवड्यातही चांगला प्रतिसाद आहे. सर्वच शहरात ‘सैराट’ पुन्हा पाहिला जातोय. असंख्य प्रेक्षकांनी अनेकवेळा हा चित्रपट पाहिला आहे आणि अजूनही ते पाहात आहेत. तिकीटे न मिळाल्यामुळे निराश झालेले प्रेक्षक पाचव्या आठवड्याकडे संधी म्हणून पाहात आहेत. या आठवड्यात ‘सैराट’ १०० कोटीच्या दिशेने वाटचाल करेल. पण सहाव्या आठवड्यात हा जादुई आकडा पार होऊ शकतो असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here